
भंडारा पत्रिका / प्रतिनिधी तिरोडा/ गोंदिया :- गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा शहरात मध्ये रात्रीच्या सुमारास गाडीला कट मारल्याच्या वादातून एका बीएसएफ जवानाने एका व्यक्तीवर बंदूक ताणत जमिनीवर गोळीबार केला मात्र या गोळीबार मध्ये एक व्यक्ती जखमी झाला त्याला स्थानी लोकांनी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केला असून त्याच्या वर उपचार सुरू आहे. ही घटना रात्रीच्या सुमारास घडली तिरोडा येथील मुख्य बाजार परिसरा जवळील गोंदिया कडे जाणाºया रस्त्यावर घडली त्या मुळे तिरोडा शहरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते… भूषण दिसे असे बीएसएफ जवानाचे नाव असून तो मूळचा नाशिक जिल्ह्यातील सटाणा येथील रहिवासी आहे… तो सध्या पंजाब येथे एका बटालियन मध्ये कार्यरत आहे.
सुट्टीवर गोंदिया येथे नातेवाईकाकडे आला होता… तर काल रात्री तिरोडा शहरात तील मुख्य बाजार परिसरा जवळी गोंदिया कडे जाणाºया रस्त्यावरून जात असताना बीएसएफ जवान भुषण दिसे आणि जखमी स्वानंद पारधी या मध्ये गाडी कट का मारल्या मुळे किरकोळ वाद सुरू झाला. दरम्यान हा वाद वाढत असल्याने बीएसएफ जवानाने आपली दहशत दाखविण्या साठी आपल्या गाडीच्या डोकीतून बंदूक काढली व जमिनीवर गोळी बार करत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला.
मात्र जमिनीवर चालवलेली गोळी मुळे रस्त्यावरील सीमेटचा तुकडा एका च्याहनुवटीला लागली व तो व्यक्ती रक्त बनबाळ झाला असून जखम झाला. मात्र स्थानिकांनी जखमीला व्यक्तीला तात्काळ रुग्णालयात दाखल केले. व त्याच्यावर उपचार करण्यात आले असून सध्या जखमीची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. तर या प्रकरणात बीएसएफ जवानावर तिरोडा पोलिसात गुन्हा नोंद करत त्याला अटक केली आहे… व त्याच्या जवळी बंदूक सुद्धा पोलिसांनी जप्त केली आहे. असून या प्रकरणात भारतीय संहिता (बी एन एस) २०२३ अंतर्गत १२५ ं, ३५१३, व शस्त्र अधिनियम १९५९ अंतर्गत ३० गुन्हा दाखल करण्यात आला असून तिरोडा पोलिसांनी बीएसएफ जवानांला तिरोडा येथील न्यायालयात हजर करण्यात आले असून न्यायालयाने त्याला जामीन मंजूर केली आहे. पुढील तपास सुरू आहे.