
भंडारा पत्रिका / प्रतिनिधी तिरोडा : नगरपरिषद तिरोडाचे एका प्रभागाचे स्थगित झालेले मतदाना करिता आज मतदान यंत्राचे सिलिंग करण्यात येणार असल्याची माहिती तिरोडा निवडणूक कायद्यालयातर्फे मिळाली आहे. निवडणूक आयोगाकडून तिरोडा नगर परिषदेचे प्रभाग क्रमांक दहा अ चे स्थगीत झालेले मतदान २० डिसेंबर २०२५ रोजी होणार असून याकरिता मतदान यंत्राचे सिलिंग आज गुरुवार दिनांक १८ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता औद्योगिक प्रशिक्षण संस्था तिरोडा येथे होणार असून याकरिता इच्छुक उमेदवार किंवा त्यांचे प्रतिनिधींनी वेळेवर हजर राहावे अशी माहिती तिरोडा निवडणूक निर्णय अधिकारी एन. एम. ठाकरे यांनी दिली आहे.