
भंडारा पत्रिका / प्रतिनिधी तिरोडा : तिरोडा शहरातून जाणाº खैरलांजी मार्गांवरील राणी अवंतीबाई पुतळ ते तेलटंकी खैरलांजी मार्गावर सतत जड वाहने धावत असल्याने मोठया प्रमाणावर वाहतुक कोंडी होऊन अपघाताची शक्यता बळावली आहे. करीता या मार्गावरील चार चाकी वाहनासह जड वाहनासाठी एकेरी वाहतूक करण्याची मागणी तिरोडा व्यापारी संघटने तर्फे उपविभागीय अधिकारी,तहसीलदार, पोलीस अधिकारी, मुख्याधिकारी नगरपरिषद तिरोडा यांना निवेदनाद्वारे केली आहे.
व्यापारी संघटन तिरोडा द्वारे संघटना अध्यक्ष सुनील बारापात्रे, सचिव सलीम जवेरी, रफिक शेख ,नहिम जवेरी, राजु पशीने ,शौकीन बनकर, मोहन ग्यानचंदानि, प्रकाश मेहरचंदानी, केशव जसईवाल, साधूराम बेलानी, विशाल अवसरेयांचे सह संघटनेचे प्रतिनिधींनी दिनांक १६ डिसेंबर रोजी दिलेल्या निवेदनानुसार तिरोडा शहरातून खैरलांजीकडे जाणारे मार्गावर दोन्ही बाजूला दुकाने व धार्मिक स्थळे असुन सतत चार चाकी वाहनासह रेतीचे चाकी टिपर,ट्रक, व अन्य जड वाहने व महामंडळाच्या बसेसही धावत असल्याने या मार्गावर सतत वाहतूक कोंडी होत असते.या जड वाहतुकीमुळे अपघाताची शक्यता बळावली असल्याने राणी अवंतीबाई पुतळ्यापासून मार्बदबोडी पर्यंत जडवाहने व चारचाकी वाहनांंकरिता एकेरी वाहतूक करावी अशी मागणी करण्यात आली आहे.