
भंडारा पत्रिका प्रतिनिधी तिरोडा : तालुक्यातील धादरी गावातील सहा वर्षीय बालक अंगंणात खेळत असताना जोरदार वादळीवारा सुरू झाल्याने भीतीमुळे घरात धावत जात असता डोक्यावर टीव्हीची लोखंडी छत्री पडून गंभीर जखमी झाल्याने गोंदिया येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शनिवार दिनांक ३० मे रोजी संध्याकाळी ५ वाजता चे दरम्यान संपूर्ण तिरोडा तालुक्यात जोरदार वादळीवारा सुरू झाला तर काही ठिकाणी पावसानेही हजेरी लावली. याच दरम्यान धादरी येथील सहा वर्षीय आयुष्य शिशुपालनाने हा घराबाहेर खेळत असताना अचानक जोर- दार वादळी वारा व पाऊस सुरू झाल्याने घाबरून धावत घराच्या आत जात असता अचानक घरावरील टीव्हीची लोखंडी छत्री वाºयाने उडून त्याच्या डोक्यावर पडली. त्यात तो मुलगा गंभीर जखमी झाल्याने त्याला त्वरित तेरोडा येथील खाजगी रुग्णालयात उपचाराकरिता नेले असता डॉक्टरांनी प्राथमिक उपचार करून त्याला गोंदिया येथे पुढील उपचाराकरीता पाठविले. सध्या आयुष्य याचेवर गोंदिया येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असुन त्याचे डोक्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.