मानसिक रुग्ण युवतीला वन स्टेप कक्षात केले दाखल

भंडारा पत्रिका प्रतिनिधी तिरोडा : तिरोडा तालुक्यातील पुजारी टोला येथील महिला नामे शीला अनिल नेरकर यांचे घरासमोर संध्याकाळी सहा वाजता दरम्यान एक वेडसर अनोळखी युवती दिसून आली असता गावकºयांनी सदर युवतीस विचारपूस केली असता तिला तिचे स्वत:चे नाव माहिती नसून कुठे राहते याबाबत देखील माहिती सांगू शकली नाही. त्यामुळे गावकºयांनी सदर युवतीस पोलीस स्टेशन तिरोडा येथे आणले (अंदाजे वय-२२ ते ३० दरम्यान) सदर मुलीच्या डाव्या हातावरती गोंदन केलेले असून त्यावरती पूजा आणि अरविंद असे मराठीमध्ये लिहिलेले आहे .सदर युवतीची उंची ५ फूट असून निळ्या रंगाचा टॉप व गुलाबी आणि पांढºया रंगाची लाइन असलेली लेगिन घातलेली असून तिरोडा पोलिसांनी युवतीची उपजिल्हा रुग्णालय तिरोडा येथे वैद्यकीय तपासणी करून तिच्या कुटूंबियांचा शोध घेणे सुरू आहे. सदर युवतीस गोंदिया केटीएस रुग्णालयातील वन स्टॉप सेंटर (आधार नसलेल्या महिला मुलींसाठी मदत केंद्र ) दाखल केले असून सदर मुलगी कुणाच्या ओळखीची असल्यास गोंदिया येथील वन स्टॉप केंद्र किंवा तिरोडा पोलिसांची संपर्क साधण्याचे आवाहन तिरोडा पोलिसांनी केले आहे.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *