नदीपात्रातुन रेती चोरी करणारा ट्रॅक्टर महसूल विभागाने पकडला

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी तिरोडा : तालुक्यातील चांदोरी खुर्द नदीपात्रातून रेती चोरी होत असल्याची माहिती ९ रोजी महिला ग्राम महसूल अधिकाºयांना मिळाल्याबद्दल त्यांनी महसूल सेवकासह जाऊन सदर ट्रॅक्टर ताब्यात घेऊन कार्यवाही केली. तिरोडा तहसील कार्यालयातर्फे मिळालेले माहितीनुसार नऊ मे रोजी संध्याकाळी खैरलांजी तलाठी साज्याच्या महिला ग्राम महसूल अधिकारी पायल कावळे यांना चांदोली खुर्द नदी पात्रातून रेती चोरी होत असल्याची माहिती नऊ तारखेचे संध्याकाळी मिळाल्यावरून त्यांनी महसूल सेवकासह चांदोरी खुर्द नदी पात्रात जाऊन पाहणी केली असते एका बिना नंबरचे ट्रॅक्टर ट्रॉली मध्ये रेती भरत असल्याचे दिसुन आले. त्यांनी सदर ट्रॅक्टर चालकास रेती वाहतुकीचा परवाना बाबत विचारला असता ट्रॅक्टर चालक योगेश रमेश तूरकर बघोली यांने आपल्याकडे परवाना नसल्याचे सांगून अरेरावी करत ट्रॅक्टर मधील रेती खाली करून ट्रॅक्टर पळवण्याचा प्रयत्न केल्याने सदर ट्रॅक्टर रेतीमध्ये फसला असता महसूल अधिकाºयांनी जेसीबी चे सहाय्याने ट्रॅक्टर काढून तहसील कार्यालय तिरोडा येथे जमा करून कार्यवाही केली.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *