प्रवचनकार विलास लवांडे यांच्यावरील भ्याड हल्ला हा वारकरी संप्रदाय व लोकशाही मूल्यांचा अपमान!

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा: राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रदेश प्रवक्ते, भागवत वारकरी महासंघाचे समन्वयक तथा प्रसिद्ध प्रवचनकार विलास लवांडे यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा भंडारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने तीव्र निषेध करण्यात आला. वारकरी संप्रदायाचा वारसा जपणारे आणि समाजाचे प्रबोधन करणाºया एका प्रवचनकारावर अशा प्रकारे हल्ला होणे, हे महाराष्ट्राच्या संस्कृतीला न शोभणारे आहे, अशी संतप्त भावना जिल्हाध्यक्ष चरण वाघमारे यांनी व्यक्त केली. विलास लवांडे हे केवळ राजकीय नेते नसून, भागवत वारकरी महासंघाचे समन्वयक आणि अभ्यासू प्रवचनकार आहेत. प्रवचनाच्या माध्यमातून त्यांनी समाजातील अनिष्ट रूढींविरुद्ध नेहमीच आवाज उठवला आहे.

लोकशाहीत वैचारिक मतभेद असू शकतात, पण विचारांची लढाई विचारांनी लढण्याऐजी अशा प्रकारे शारीरिक हल्ला करणे ही भ्याड प्रवृत्ती आहे. करीता या घटनेतील मुख्य सूत्रधार आणि हल्लेखोरांना पोलिसांनी २४ तासांच्या आत अटक करावी, सामाजिक क्षेत्रात काम करणाºया एका प्रवचनकारावर हल्ला करणाºयांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, जिल्ह्याचे सामाजिक वातावरण बिघडवणाºया आणि दहशतीचे राजकारण करणाºया प्रवृत्तींचा पोलिसांनी तातडीने बंदोबस्त करावा अशी मागणी चरण वाघमारे यांनी केली आहे. विलास लवांडे यांच्यावर झालेला हा हल्ला केवळ एका व्यक्तीवर नसून तो वारकरी विचारांवर झालेला आघात आहे. जर पोलीस प्रशासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन दोषींवर कठोर कार्यवाही न केल्यास भंडारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरदचंद्र पवार) वतीने संपूर्ण जिल्ह्यात तीव्र निदर्शने करण्याचा इशारा चरण वाघमारे यांनी दिला आहे.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *