
भंडारा पत्रिका / प्रतिनिधी जवाहरनगर :- भंडारा जिल्ह्यातील कोट्यावधीचा अवैध वाळूसाठा प्रकरण ताजे असताना यांचे पडसाद हिवाळी अधिवेशनात गाजत असताना जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकाºयांची भंबेरी उडाली असताना,जिल्ह्यात अवैध वाळूतस्करी होवू नये, यासाठी काही वाळू घाटांजवळील मुख्य रस्त्यावर महसूल विभागाने चौक्या उभ्या केल्या आहेत. त्यामुळे ट्रॅक्टरने वाळू तस्करीला काही प्रमाणात आळा बसला आहे.
मात्र, परिसरातील राजेदहेगाव येथील वाळू तस्करी करणाºया नागरिकांनी यावर क्लृप्ती काढून नवीन रस्ता बनवून वाळू तस्करी करीत आहेत. नदीपात्रातील वाळू गावा शेजारील असलेल्या शेतात जमा करीत आहेत. राजेदहेगाव व गोवरी सुरनदी किनारी वसलेले गाव असून शेती वाळू घाट लगत आहे. शेतातून ट्रॅक्टर ट्रॉलीची वाहतूक होईल असे रस्ते तयार करून बैलबंडीधारक पहाटेला वाळू टाकण्यासाठी जातात. सध्या शेतकरी शेत पिकासोबत बैलबंडीने वाळूला व्यवसायाचे स्वरुप दिल्याचे दिसून येते.एका बैलगाडीमधील वाळू पंधराशे ते दोन हजार रुपयांना ट्रॅक्टर ट्रॉली मालकांना विकली जात आहे.
शासनाचे स्वस्त दरात रेती देण्याचे धोरण आहे. मात्र, भंडारा तालुक्यातील जवाहरनगर परिसरातील विविध रेती घाटावरून दिवस-रात्र अवैध रेती उपसा होत असून ती रेती तस्कराकडून प्रति ट्रॅक्टर पाच हजार रुपयांप्रमाणे बिनधास्तपणे विकून लोकांची लूट केली जात आहे.या वाळू घाटावर बैलगाड्या पहाटेपासून ते सायंकाळपर्यंत दिवसाला कित्येक खेपा मारून वाळूचे ढीग तयार करतात. हा सर्व प्रकार दिवसा ढवळ्या सुरू असून राजेदहेगाव-गोवरी मुख्य रस्त्यालगत मोठ मोठे वाळूचे ढिगारे तयार केल्याचे नागरिकांच्या नजरेस पडतात. याबाबत परसोडी व गोवरी तलाठी साज्यातील अधिकाºयांवर प्रश्न उपस्थित केला जात आहे. हा गोरखधंदा मागील अनेक महिन्यांपासून सुरू आहे.
या माध्यमातून नदी किनारी असलेले शेतकरी बैलबंडीच्या माध्यमातून हजारो रुपये कमावित आहेत. स्थानिक महसूल विभागाच्या डोळ्यादेखत बैलबंडीद्वारे वाळू नेली जात असतानाही त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली जात नाही. तरी बैलबंडीद्वारे बºयाच प्रमाणात वाळू तस्करी होत आहे.ही वाळू विना नंबर प्लेट च्या ट्रॅक्टर ट्रॉली वाळू माफिया महसूल अधिकाºयांच्या आशीवार्दाने नदी किनाºयावरील शेतकºयाद्वारे बैलबंडी चे वापर करून अवैध वाळू साठा तस्करी ची सखल तयार करण्यात आले आहे. यात गावातील पुढाºयांचा सहभाग प्राधान्य क्रमवारीत पुढे येत असल्याचे निदर्शनास येत आहे.अशाच प्रकारे कन्हान नदी किनाºयावरील चीचोली, सालेबर्डी, साहुली, खैरी लोहारा व कोंडी गावात अवैध रेती तस्करी चे प्रमाण अधिक असल्याने लक्ष देण्याची मागणी होत आहे.