मागेल त्याला सौर कृषी पंप योजने अंतर्गत शेतकºयांची फसवणूक

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : मागेल त्याला सौर ऊर्जा कृषी पंप योजनेअंतर्गत अनेक शेतकºयांनी डिमांड भरूले मात्र अजून पर्यंत सौर ऊर्जा कृषी पंप मिळालेला नसून त्यांची आर्थिक फसवणूक झाली आहे. त्यामुळे याप्रकरणी योग्य चौकशी करून कारवाई करण्यात यावी तसेच ज्या शेतकºयांचे डिमांड( पैसे )भरले आहेत .

त्या शेतकºयांना सौर ऊर्जा कृषी पंप देण्यात यावे. ज्या शेतकºयानी डिमांड (पैसे) भरले असून त्या शेतकºयांना सौर ऊर्जा कृषी पंप देण्यात येत नसेल तर त्यांना व्याजासह रक्कम परत करावी अशी मागणी अन्यायग्रस्त शेतकरी संघर्ष समिती जिल्हा भंडाºयाच्या वतीने राज्याचे मुख्यमंत्री यांना भंडारा जिल्हाधिकारी यांचेमार्फत पाठविण्यात आलेल्या निवेदनातुन करण्यात आली आहे. मागेल त्याला सौर ऊर्जा कृषी पंप योजना महाराष्ट्र शासनाच्या वतीने सुरू करण्यात आली.

त्यामुळे अनेक शेतकºयांनी आॅनलाइन अर्ज भरले अर्ज मंजूर झाले त्याचे डिमांड (पैसे) भरले. त्यानंतर विद्युत विभाग आणि कंपनीच्या कर्मचारी यांनी शेतावर येऊन मोका चौकशी केली. त्यात ज्या शेतकºयांकडे विद्युत कनेक्शन आहे त्यांना सौर ऊर्जा कृषी पंप देता येत नाही. म्हणून त्यांचे अर्ज नामंजूर केले. अर्ज ना मंजूर झालेल्या शेतकºयांना भरलेल्या डिमांड चे (पैसे) अजून पर्यंत परत केले नाही. तसेच अर्ज भरताना ज्या शेतकºयाकडे विद्युत कनेक्शन आहे त्यां शेतकºयांना सौर ऊर्जा कृषी पंप योजनेचा लाभ घेता येणार नाही. असे काही नमूद केलेले नाही. यात शेतकºयांची आर्थिक फसवणूक झाल्याचे दिसुन येते.करीता सदर प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. निवेदन देतांना अन्यायग्रस्त शेतकरी संघर्ष समिती जिल्हा भंडाराचे अध्यक्ष चंद्रशेखर भिवगडे, कार्याध्यक्ष विष्णुदास लोणारे, सचिव पुरुषोत्तम गायधने, सदस्य व्यंकटेश गायधने उपस्थित होते.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *