तिरोडा तालुक्यात अवैध रेती उत्खनन व वाहतूक करणाºयांवर ओढवली संक्रांत

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी तिरोडा : तिरोडा महसूल विभागातर्फे अवैधरित्या होणारे रेती उत्खनन व वाहतुकीवर प्रतिबंध करण्याकरता २४ तास भरारी पथकाची नियुक्ती करण्यात आली असली तरी मोठ्या प्रमाणात अवैध रेती उत्खनन व वाहतूक होत असून दिनांक १७ व १८ जानेवारी रोजी महसूल विभागाने दोन ट्रॅक्टर व पाच टिप्परवर कार्यवाही केली असून तिरोडा पोलीसांनीही एक अवैद्य रेती वाहतूक करणारा ट्रॅक्टर जप्त करून कारवाई केली आहे.

तिरोडा तालुक्यातील काही रेती घाटाचे लिलाव होऊन या घाटावरील डेपो मधून परवाना देऊन रेती वितरण होत असले तरी अनेक जागेवरून मोठ्या प्रमाणात अवैध रेतीचे उत्खनन व वाहतूक होत असल्याने तिरोडा तहसीलदार नारायण ठाकरे यांनी २४ तास भरारी पथकाची नियुक्ती केली असून १७ व १८ जानेवारी रोजी या भरारी पथकापैकी अर्जुनी येथील पथकाने अर्जुनी येथील रेती भरून जाणारा ट्रॅक्टर जप्त करून तहसील कार्यालय तिरोडा येथे लावला असून मंडळ अधिकारी सुनील शहारे, महसूल अधिकारी ईशांत दमाहे, देवेंद्र भगत, स्वप्निल कारभारी, सुनील डोंगरे, महसूल सेवक लक्ष्मीकांत पटले यांचे पथक गस्तीवर असताना त्यांना मिळालेले माहितीवरून त्यांनी मांडवी घाटावर जाऊन पाहणी केली असता येथे अवैधरित्या रेती उत्खनन करून वाहतूक करण्याची तयारीत असलेले टिप्परवर कारवाई करण्यास गेले असता

यातील २ बाराचाकी टिप्पर क्रमांक एम एच ४० सीटि ४५९७ व एम एच ४९ बिझेड ०४२० या टिप्पर चालकांनी आपले टिप्पर बळजबरीने नेऊन रस्त्यात रेती उतरवून पळ काढल्याने तहसीलदार तिरोडा यांनी पोलीस निरीक्षक तिरोडा यांना लेखी पत्र देऊन या अवैध उत्पन्न व वाहतूक करणारे टिप्पर व टिप्पर मधील अंदाजे वीस ब्रास रेती असा अंदाज आहे ६४ लक्ष ७७ हजार ६६० रुपयांचे मुद्देमालावर कार्यवाही करण्याचे पत्र दिले असून टिप्पर क्रमांक एम एच ४९ बीझेड ८८२२ यात १० ब्रास रेती, एमएच ४९ बी झेड ४९४३ अंदाजे १० ब्रास रेती, एमएच ३५ ए डब्ल्यू ३१४४ क्रमांकाचे ट्रॅक्टरमध्ये एक ब्रास रेती जप्त करून ट्रॅक्टर तहसील कार्यालय तिरोडा येथे जमा करण्यात येऊन सदर वाहनावर दंडात्मक कार्यवाही करिता उपविभागीय अधिकारी तिरोडा यांचे प्रकरण पाठवले असल्याची माहिती तिरोडा तहसील कार्यालयालयाकडून मिळाली असून अवैध रेती उत्खनन व वाहतूक करणाºयावर अशाच प्रकारची कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार तिरोडा नारायण ठाकरे यांनी दिली.

तिरोडा पोलीस स्टेशनचे कर्मचारी पोलीस शिपाई चेतन फुले हे १७ जानेवारीच्या रात्री गस्तीवर असताना त्यांना सालेबर्डी रेल्वे गेट जवळून ट्रॅक्टर क्रमांक एमएच ३५ ए डब्ल्यू ३७९७ रेती भरून जात असल्याचे दिसले वरून यांनी ट्रॅक्टर थांबवून चालकास परवान्याबाबत विचारपूस केली असता चालकाने आपण ही रेती मांडवी घाटावरून भरून आणली असून आपल्याकडे रेती वाहतुकीचा परवाना नसल्याचे सांगितल्यावरून पोलीस शिपाई चेतन फुले याचे फिर्यादीवरून तिरोडा पोलीस स्टेशन येथे सदर ट्रॅक्टर चालका विरुद्ध गुन्हा नोंद करून एक ब्रास रेती सह ट्रॅक्टर व ट्रॉली अंदाजे किंमत सहा लक्ष सहा हजार जप्त करून कारवाई केली.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *