पं.स.च्या मासिक सभांना अनुपस्थित असणाºया गट विकास अधिकारी विरोधात पं.स.सदस्य आक्रमक

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी तिरोडा : तिरोडा पंचायत समितीचे मासिक सभांना सतत गैरहजर राहणारे डॉक्टर विकास अधिकाºयांमुळे सभेत सदस्यांनी मांडलेल्या विषयांवर योग्य प्रकारे चर्चा किंवा निर्णय होत नसल्याने तसेच यावर कुठलेही अधिकारी कर्मचाºयांवर कार्यवाही होत नसल्याने सभागृहाचा अवमान होत असल्याचे सभागृहाचा समज होत असल्याने या विरोधात जि. प. मुख्य कार्यपालन अधिकारी यांना निवेदन देऊन कार्यवाही करण्याच्या मागणीचा ठराव आज झालेल्या मासिक सभेत घेण्यात आला.

तालुक्यातील पंचायत समिती अंतर्गत होणारे विकास कामे अडचणी व योजनांचे बाबत पंचायत समितीचे मासिक सभेत सर्व विभागाचाआढावा घेण्यात येऊन काही तक्रारी किंवा अडचणी असल्यास याबाबत चर्चा करून तक्रारी किंवा अडचणी सोडवून किंवा संबंधिता विषयाचे प्रस्ताव तयार करून जिल्हा परिषदेकडे पाठवण्यात येतात तसेच या सभेचे अध्यक्ष,सभापती व सचिव म्हणून गटविकास अधिकारी असतात व ते सभेचे संचलन करुन सभेचे कामकाज चालवतात मात्र फेब्रुवारी २०२६ मध्ये तिरोडा पंचायत समिती अंतर्गत महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेचे पाच कोटी रुपयाचे गैरप्रकरणाचे प्रकरण उघडकीस आल्याने तिरोडा पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी सतत फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, व आज दिनांक २७ मे रोजी असलेल्या मासिक सभेस हजर नसल्याने या सभेत सदस्यांकडून मांडण्यात येणारे विषयांवर प्रभारी सचिव कुठलेही निर्णय घेत नसून आपण हे विषय गटविकास अधिकाºयांकडे मांडू असे सांगतात ज्यामुळे सभासदांकडून मांडण्यात येणारे विषयांवर चर्चा किंवा कुठलीही कार्यवाही न होता तसेच यास कारणीभूत अधिकारी व कर्मचाºयांवर कुठलीही कार्यवाही होत नसल्याने हा या सभागृहाचा अवमान असल्याचा समज झाल्याने सर्व सदस्यांनी हा विषय सभाध्यक्ष यांच्याकडे मांडला. सभेचे अध्यक्ष तथा सभापती तेजराम चव्हाण यांनी सदस्यांच्या भावना समजून सवार्नुमते गटविकास अधिकारी यांचे बाबत मुख्य कार्यपालन अधिकारी जिल्हा परिषद गोंदिया यांना निवेदन देऊन त्यांचेवर योग्य ती कार्यवाही करावी असा ठराव घेऊन लवकरच सभापती तेजराम चव्हाण यांच्या नेतृत्वात सर्व सदस्य मुख्य कार्यपालन अधिकारी जिल्हा परिषद गोदीया यांची भेट घेऊन आपले गाºहाणे मांडणार असल्याची माहिती सभापती तेजराम चव्हाण यांनी दिली आहे.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *