अवैध कत्तल खाना: तिरोडा न.प.ने केला सिल

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी तिरोडा : तिरोडा शहरातील झाकीर हुसेन वार्डतील अवध्य कत्तलखाना उघडकीस आला असता या कत्तलखान्यावर तिरोडा पोलिसांनी धाड टाकून तीन आरोपीतांवर गुन्हा नोंदवला होता तसेच या कत्तलखान्यात गोमास व गोवंशीय जनावरे आढळून आल्याने हिंदू बांधवांच्या भावना दुखावल्या वरून सकल हिंदू समाजातर्फे हा कत्तलखाना पाडण्यात यावा अन्यथा चक्काजाम करण्याचे निवेदन दिल्या भरून २४ डिसेंबर रोजी तिरोडा नगर परिषदेतर्फे हा कत्तलखाना सील करण्यात आला आहे.

तिरोडा शहरातील झाकीर हुसेन वार्डात अवधरीत्या कत्तलखाना चालवून या कत्तलखान्यात १४ वर्षीय जनावर तथा गोमा सागळून आल्याने तिरोडा पोलिसांनी धाड टाकून तीन आरोपी विरुद्ध गुन्हा नोंद करून कार्यवाही केली मात्र या प्रकरणामुळे हिंदू समाजाच्या भावना दुखावल्याने सकल हिंदू समाजातर्फे या घटनेचा निषेध नोंदवत १८ डिसेंबर रोजी गजानन महाराज मंदिर येथे सार्वजनिक हनुमान चालीसा वाचन करून नगरपरिषद तिरोडा येथे मोर्चाने जाऊन मुख्याधिकारी अमोल माळकर यांना निवेदन देऊन हा कत्तलखाना २६ तारखेपर्यंत पाडण्यात यावा अन्यथा खैरलांजी मार्गावर चक्काजाम करण्यात येईल असा इशारा दिला होता. तिरोडा नगर परिषदेने तिरोडा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय कवडे, हवालदार नितेश बावणे , शिपाई शैलेश दमाहे यांचे उपस्थितीत कत्तलखान्याला सील ठोकले आहे.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *