भंडारा न.प.भाजप गटनेतेपदी आशु गोंडाने यांची निवड

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : भंडारा नगर परिषद झालेल्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचे नगराध्यक्ष व २३ नगरसेवक निवडून आले होते. त्या अनुषंगाने आज दिनांक ३० डिसेंबर २०२५ रोजी भारतीय जनता पार्टी गटाची निवडणूक पार पडली.

ही निवडणूक भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेते अ‍ॅड. कैलाश भुरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी भाजपच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा व सर्व नगरसेवकांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत जिल्हाध्यक्ष आशु गोंडाने यांची सर्वानुमते भाजप गटनेते म्हणून निवड करण्यात आली.या प्रसंगी नवनिर्वाचित नगराध्यक्षा मधुराताई मदनकर यांच्यासह नगरसेवक भाग्यश्रीताई कळंबे, . चंद्रकलाताई भोपे, कुलप्रीत कवलजितसिंग चड्डा, भगवान देवराव बावनकर, रिताताई शैलेश मेश्राम, शिवशंकर माणिक आजबले, प्रियाताई शैलेश खरोले,आशाताई हरिश्चंद्र उईके, निमिश डोकरीमारे, वृषालीताई अजय ब्राह्मणकर, रूपालीताई रवींद्र नेवारे, नितीन गायधने, सचिन घनमारे, प्रीतीताई अविनाश ब्राह्मणकर, राजकुमार व्यास, आशिष राधेश्याम गोंडाने, प्रीतीताई ईश्वरीलाल गाढवे, मंगेश वंजारी, बल्ली भाई, कु. अल्फिया अमीर शेख, हरिश्चंद्र मडावी, ललितकुमार जांभुळकर, ज्योतीताई हरीश मोगरे आदि उपस्थित होते.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *