माता मंदिरात सापडला नवजात शिशू चा मृतदेह

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गर्रा बघेडा : लेकरांना आपण जीवपेक्ष- ाही जास्त जपतो. मात्र माणुसकीला लाजवेल आणि निष्ठरपणाचा कळस गाठणाºया एका घटनेने तुमसर तालुक्यातील राजापूर गावात खळबळ माजली आहे. एका दिवसाच्या नवजात चिमुकल्याचा मृतदेह गावातील देवीच्या मंदिरात आज दिनांक ३० रोजी पहाटे ५:१५ वाजेच्या सुमारास आढळल्याने मोठी खळबळ उडाली. मंदीराचे पुजारी येदुनाथ परबते हेनेहमी प्रमाणे पुजा करण्याकरिता मंदीरात गेले असता शिवमंदिराच्या बाजूला दुर्गा देवीच्या बाजूला लाल पिवळ्या फुलांच्या डिजाइन च्या कापडात एक नवजात शिशु चा मृतावस्थेत आढळून आला . पोलीस पाटील दिवाकर लक्ष्मण डोंगरे यांनी सदर घटनेची माहिती तात्काळ गोबरवाही पोलीस स्टेशन ला दिली असता गोबरवाही पोलीसांनी घटनास्थळ गाठुन तपास सुरू केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक शरद शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्ष् ाक निवृत्त गिते हे करीत आहेत.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *