नगराध्यक्षांवर तुमसरकरांचा विश्वास!

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी तुमसर : नेतृत्वावर विश्वास असेल, तर गाºहाणी मांडणारी लोकही पुढे येतात. असाच एक अनुभव तुमसर च्या नगराध्यक्षांनी घेतलेल्या जनता दरबाराच्या निमित्ताने आला. या जनता दरबारात तक्रारींचा चक्क पाऊस पडला, अवघ्या काही तासांत १०० हून अधिक प्राप्त तक्रारींचा निपटराही तेवढ्याच तत्परतेने नगराध्यक्षांनी करून लोकांमधून निवडून आलेल्या या पदाला साजेशी कृती केली. काहीना नोटीस, काहीना सूचना तर कुठे कारवाई ही नगराध्यक्षांची कृती तुमसरकरांना आपलेसे करून गेली. आमदार खासदारांचे जनता दरबार होतात. खरंतर मोठ्या लोकांपर्यंत जाताना सामान्य नागरिक जरा दचकतोच. या लोकप्रतिनिधीच्या जनता दरबाराचा उपक्रम नेहमीच पाहायला मिळतो. परंतु नगराध्यक्षांनी जनता दरबार घेतल्याचे पहिल्यांदाच जिल्हावासीयांनी पाहिले.

तुमसर चे नगराध्यक्ष इंजि. सागर मनोहर गभने यांचा आज १० मार्च रोजी तुमसरच्या जनता दरबारात १०० हून अधिक तक्रारींचा पाऊस तक्रारी जाणून घेताना नगराध्यक्ष इंजि. सागर गभने नगरपालिका कार्यालयात जनता दरबार झाला. निवडणूक असो की नसो लोकांची तेवढ्याचच आस्थेने विचारपूस करणाºया इंजि.सागर गभणे नगराध्यक्ष झाल्याने त्यांच्या अधिकारांचा आणि कार्यक्षेत्राचा विस्तार झाला. प्रत्येक जण आपल्या अडचणी घेऊन लोकप्रतिनिधीपर्यंत येऊ शकत नाही. अशावेळी जनता दरबार हे महत्त्वाचे माध्यम ठरते. त्याचाच अवलंब करीत इंजि. सागर गभने यांनी हा उपक्रम केला आणि त्याला उदंड प्रतिसाद मिळाला. तब्बल १०० हून अधिक तक्रारी घेऊन तुमसरकर दरबारात दाखल झाले. अतिक्रमण, स्वच्छता, पिण्याचे पाणी, दिवाबत्ती अशा अनेक तक्ररीचा समावेश यात होता. बहुतांश तक्रारींचा निपटारा तेथेच करण्यात आला. अतिक्रमण धारकांना नोटीस देण्याच्या सूचना दिल्या गेल्या.

पथदिव्यांची व्यवस्था ताबडतोब करण्याचे निर्देश दिले गेले. फुटलेल्या नळाच्या पाईप लाईन किंवा अन्य पिण्याच्या पाण्याच्या तक्रारीचा ताबडतोब निपटारा करण्याचे स्पष्ट निर्देश यावेळी दिले गेले. नगर पालिकेचे प्रशासकीय यंत्रणाही हाताशी होती. अडचण घेऊन आलेल्या प्रत्येकाचे समाधान करण्याचा प्रयत्न झाला. आपले म्हणणे ऐकून घेत, तोडगा काढण्याचे आश्वासन मिळाल्याने अनेकांच्या चेहºयावर समाधान जाणवत होते. तक्रार केल्यानंतर त्याचे निराकरण होईल, असा विश्वास असल्यानेच तुमसरकरांनी जनता दरबाराला उदंड प्रतिसाद दिला. यातून नेतृत्वावरील विश्वास स्पष्ट झळकतो. लोकांमधून निवडून आलेल्या नगराध्यक्ष अशाच लोकाभिमुख राहिल्यास शहराचे चित्र बदलण्यास वेळ लागणार नाही. यावेळी तुमसर शहरातील नगर सेवक वैशाली भवसागर, रेखा चकोले, रोशनी भोंडेकर, वैशाली हिंगणे, चक्रेश्वर(बाल्या) बिसने, नीता तिबुडे, सोनिया धुर्वे, गुलराज कुंदवानी, पंकज बालपांडे, शीतल पेठे, स्मिता आथीलकर, नलिनी डिंकवार आदि उपस्थित होते.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *