
भंडारा पत्रिका / प्रतिनिधी लाखनी :- सध्या परिसरात रेती तस्कर मोठ्या प्रमाणात वाढले असून ट्रॅक्टर व टिप्पर द्वारे रेतीची वाहतूक सुरू आहे. जिल्ह्यातील बंद असलेल्या रेती घाटावरून ट्रॅक्टर व टीप्पर द्वारे काही निवडक रेती तस्कर रेतीची खुलेआम वाहतूक करीत आहेत. यात महसूल विभाग कोणतीही कारवाही करताना दिसून येत नाही उलट पकडून आणलेले ट्रँक्टर लक्ष्मीदर्शन झाल्यावर विनाकारवाही ने सोडून दिल्या जात असल्याचा संतापजनक प्रकार तालुक्यात सुरु आहे. त्यामुळे हा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर महसूल विभागाच्या आशीर्वादाने फोफावला आहे. परिसरातील काही निवडक तस्कर भुगाव, पळसगाव, डोंगरगाव, कन्हाळगाव या रेती घाटावरून रेतीची अवैध वाहतूक २५ हजाराच्या मासिक हप्त्याने राजरोसपणे सुरु आहे.
त्या तस्करांचे टेहाळणी करणारे निवडक खबरे हे तहसील व पोलीस स्टेशन परिसरात वावरत असून त्यांच्यामार्फत या तस्करांना इत्यंभूत माहिती पुरविण्यात येत असते या खबºयांमार्फत माहिती दिल्याने तात्काळ सावध होऊन चोरीच्या मार्गाचा अवलंब करीत रेती चोरी जोमात करीत आहेत. येथील पोलीस स्टेशनमध्ये असलेल्या कॅमेºयाची तपासणी केल्यास जाणारे- येणारे रेतीचे टिप्पर व ट्रॅक्टर यांची माहिती सहज उपलब्ध होऊ शकते. तस्कर आणि अधिकारी यांचे साटे -लोटे असल्यामुळे त्या तस्करांचे व संबंधितांचे आर्थिक हित जोपासले जात असल्यामुळे तस्करांना अभय कोणाचा? हा प्रश्न जरी असला तरी यात मात्र अधिकाºयांचा टेबलाखालून व्यवहार होत असल्यामुळे हा अवैध व्यवसाय दिवसेंदिवस व फोफावत आहे. प्राप्त माहितीनुसार अनेक ट्रँक्टर चालक मालक अवैध रेती वाहतुकीच्या गोरखधंद्यात गुंतले असून ट्रक्टर चालक मालकावर कारवाही होण्याऐवजी त्याला चौकशीसाठी तहसील कार्यालयात आणले जात असले तरीही थातूरमातुर चौकशीच्या नावावर लक्ष्मीदर्शन झाल्यावर सोडून दिल्या जात असल्याचा प्रकार दिसून येत आहे.