
भंडारा पत्रिका/वार्ताहर सिहोरा : सिहोरा परिसरात सुरु असलेल्या शासकीय सिमेंट रस्ता बांधकामात पाण्याच्या क्यूरिंगचा अभाव असल्याने गुणवंत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. उमरवाडा ते तामसवाडी गावाला जोडणाºया मार्गांवर सिमेंट रस्त्याचे बांधकाम करण्यात आले आहे. परंतु सिमेंट रस्ता बांधकामाचे मजबुतीकरणासाठी पाणी घातले जात नसल्याने गावकºयांनी संताप व्यक्त केला आहे. धुळीचे कण उडत असल्याने गावकरी वैतागले आहेत. सिमेंट रस्ता बांधकामाची चौकशी करण्याची मागणी होत आहे. सिहोरा परिसरातून गेलेल्या माडगी ते गोबरवाही मार्गांचे सिमेंट रस्ता बांधकाम सुरु करण्यात आले आहे. मार्गाचे रुंदीकरण आणि सिमेंट रस्ता बांधकामाला कंत्राटदाराने सुरुवात केली आहे. टप्प्या – टप्प्याने गावाचे शिवारातून सिमेंट रस्त्याचे बांधकाम होत आहे. या सिमेंट रस्त्यावर मजबुतीकरणांसाठी पाण्याची गरज असतांना अपेक्षित पाणी घातले जात नसल्याचे दिसून आले आहे.
एक दोन दिवस पाणी घातल्यानंतर क्यूरिंग बंद करण्यात येत आहे. उमरवाडा ते तामसवाडी गावाला जोडणाºया मार्गाचे सिमेंट रस्त्याचे एका बाजूचे बांधकाम पूर्ण झाले आहे. हे बांधकाम परिपक्व करण्यासाठी पोती घालण्यात आली आहेत मात्र पाणी घातले जात नाहीत. पोते अस्तव्यस्त घालण्यात आले आहे. सिमेंट रस्त्याला पोत्याचे आच्छादान देण्यात आले नसल्याने पाण्याचा सिमेंट रस्त्यावर निचरा होत नाही. यामुळे मजबुतीकरणाला पाण्याचा अभाव आहे. या मार्गांवरून दुहेरी वाहने धावत असतांना धुळीचे कण डोळ्यात जात आहे. कोट्यवधी रुपयाच्या सिमेंट रस्ता बांधकामात मुबलक पाण्याचा वापर होत नसल्याने गुणवंत्तेवर नागरिकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे. कडेला मुरूम नसल्याने अपघाताची भीती एकेरी सिमेंट रस्ता बांधकाम करण्यात आल्यानंतर याच मार्गाचे दुहेरी वाहने धावत आहेत. सिमेंट रस्त्याचे बांधकाम पूर्ण करण्यात आले नाही. एकेरी सिमेंट रस्त्याचे कडेला मुरूम घालण्यात आले नसल्याने वाहनाचा अपघात होण्याची शक्यता आहे. रात्री या मार्गाने प्रवास करताना भीती राहत आहे. एकेरी सिमेंट रस्ता नागरिकांच्या जिवावर बेतणारा ठरत आहे. दुचाकी चालकांच्या मनात भीती निर्माण झाली आहे. सदर कामाची चौकशी करण्यात यावी अशी नागरिकांची मागणी आहे.