छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाºया धिरेंद्र शास्त्री विरोधात काँग्रेस आक्रमक

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : छत्रपती शिवाजी महाराज हे आपले श्रद्धास्थान आहेत. त्यांनी जात, धर्म, संप्रदायाच्या पलीकडे जाऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. त्यावेळेस ब्राह्मणवादी विचारसरणीने त्यांच्या राज्याभिषेकास विरोध केला होता. स्वराज्यात राहूनही फितुरी करून सतत शिवाजी महाराज, संभाजी महाराज, शाहू महाराज यांना त्रास देण्याचे काम केले गेले. शिवाजी महाराजांनी स्वराज्याची संकल्पना माता जिजाऊ व जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्याकडून घेतली. प्रत्यक्षात रामदास स्वामींचा महाराजांच्या कार्यात काहीही सहभाग नाही. परंतु ही मनुवादी पिलावळ सतत बहुजनांना मानवतावादी भक्ती मार्ग शिकवणारे संत ज्ञानेश्वर, तुकाराम, एकनाथ, नामदेव, संत तुकडोजी महाराज, संत गाडगे बाबा, मानव धर्माचे संस्थापक बाबा जुमदेवजी यांना कमी लेखून मनुवादी स्वामींचा उदो-उदो करण्याचे पाखंड भाजप व संघाची ही पिलावळ करीत आहे.

या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, संघ प्रमुख मोहन भागवत उपस्थित असताना त्यांनी शिवाजी महाराजांच्या राज्यात त्यांचा अपमान करणाºया धिरेंद्र शास्त्री सारख्या ढोंगी, पाखंडी प्रवृत्तीला साथ दिली. म्हणजेच त्यांचे विचार धिरेंद्र शास्त्री बोलत आहेत. करीता शिवाजी महाराजांचा तोडमोड इतिहास सांगून महाराजांचा अपमान करणाºया धिरेंद्र शास्त्री यांचा निषेध करून त्यांचे कार्यक्रम महाराष्ट्रात करण्यास बंदी घालावी. त्यांना सहकार्य करणारे भाजप नेते मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी व संघचालक मोहन भागवत यांनी जाहीर माफी मागावी. या मागण्यांसाठी विश्रामगृह ते चिमूर्ती चौक पर्यंत निदर्शने करून निषेध करण्यात आला. यावेळी धिरेंद्र शास्त्री यांच्या फोटोला काळे फासण्यात आले, जुते-चप्पलने मारण्यात आले. याप्रसंगी काँग्रेस जिल्हाध्यक्ष मोहन पंचभाई यांच्या नेतृत्वात जयश्री बोरकर, प्रमोद मानापुरे, प्यारेलाल वाघमारे, राजेश हटवार, विजय शहारे, शैलेश पडोळे, पृथ्वी तांडेकर, भगवान नवघरे, तुलशीदास बिलवने, गजानन झंझाड, वैभव मेंढे, कुसुमताई कांबळे, ममता बिसेन, नंदाताई मोघरे, हेमराज डोकरे, सदानंद धारगावे, कुंडलीक पाऊलझगडे, सोनू कोटवानी, स्मिता मरघडे, वैशाली वालदे, फुलेश्वर वाल्देकर, धनराज साठवणे, योगेश झलके, योगेश गायधने, लेखन चवरे, जगदीश उईके, मुलचंद झश्वरकर, संजू बांते, आकाश ठवकर, शितलताई राऊत, मनिषा निंबार्ते, मदन रामटेके, रामचंद्र पाटील, सतीश बावनकर, अक्षत नंदरधने, वैशाली लोजेवार, त्रिवेणी चौधरी, स्मिता सिडाम, निर्मला नंदेश्वर व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *