गांजाचे सेवन करणारे दोन युवक जेरबंद

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी तुमसर : तुमसर शहरातील शिवाजी नगर येथील रेल्वे लाईन परिसरात सार्वजनिक ठिकाणी गांजाचे सेवन करणाºया नागपूर येथील दोन युवकांना तुमसर पोलिसांनी रंगेहात पकडून त्यांच्याविरुद्ध एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल केला. या कारवाईत एकूण १ लाख ४० हजार १२१ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे डी.बी. पथकाने शिवाजी नगर रेल्वे परिसरात सापळा रचून छापा टाकला. यावेळी दोन युवक चिलममध्ये गांजा ओढत असल्याचे निदर्शनास आले.

पोलिसांनी तात्काळ दोघांनाही ताब्यात घेत कारवाई केली. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे अंशुल नरेंद्र घरडे (वय २१, रा. गुमगाव रोड, हिंगणा, जि. नागपूर) व कार्तिक राजू वळमे (वय २०, रा. तुळमी, ता. डोंगरगाव, जि. नागपूर) अशी आहेत. आरोपींकडून गांजा सेवनासाठी वापरण्यात आलेली मातीची चिलम, माचीस, दोन मोबाईल फोन, बिडीचा कट्टा तसेच एमएच-४०- डीबी-८८४३ क्रमांकाची सुझुकी अ‍ॅक्सेस दुचाकी असा एकूण १,४०,१२१ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक नूरुल हसन, अप्पर पोलीस अधीक्षक निलेश मोरे, सहाय्यक पोलीस अधीक्षक मयंक माधव, पोलीस निरीक्षक सुभाष बारसे आणि पोलीस निरीक्षक बाळासाहेब आघाव यांच्या मार्गदर्शनाखाली डी.बी. पथकातील पोलीस हवालदार पंकज बाहेकर, पोलीस शिपाई अमोल आदमने तसेच गिरीपुंजे, बावने, बळदे आणि झंझाड यांनी यशस्वीपणे पार पाडली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रविण सयाम करीत आहेत.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *