
भंडारा पत्रिका / प्रतिनिधी तिरोडा : उपविभागीय अधिकारी तिरोडा यांचे आदेशान्वये तिरोडा पोलीस स्टेशन अंतर्गत अवैध्य दारू बाळगून विक्री करणारे एका महिलेसह तीन आरोपींना गोंदिया जिल्ह्यातून हद्दपार करण्याचे आदेश पारित करण्यात येऊन तिन्ही आरोपींना त्यांनी दिलेले जवाबानुसार भंडारा जिल्ह्यात हद्दपार करण्यात आले आहे.
तिरोडा पोलीस सुत्रानक- डून मिळालेले माहितीनुसार गोंदिया जिल्हा पोलीस अधीक्षक गोरख भामरे यांचे कडून महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम ५६ (ब) ( ब) अन्वये आदेश पारित करून पोलीस स्टेशन तिरोडा अंतर्गत बेलाटी , बुज येथील दीपक राजू चव्हाण तीस वर्ष, संत रविदास वार्ड तिरोडा येथील कविता सेवकराम तांडेकर ५०, गांगला येथील प्रशांत उर्फ गोलू सुरजलाल जायसवाल ४० यांचे विरुद्ध चौकशी अधिकारी म्हणून उपविभागीय पोलीस अधिकारी साहिल झरकर यांची नियुक्ती केल्यावरून त्यांनी तीनही आरोपी विरोधात केलेल्या चौकशीनुसार तीनही आरोपी अवैध्य दारू बाळगून विक्री करण्याचे सवयीचे असल्याने सदरचा अहवाल उपविभागीय अधिकारी तिरोडा पूजा गायकवाड यांचेकडे सादर करण्यात आला.
उपविभागीय अधिकारी यांनी तीनही आरोपींचा जबाब नोंदवून तीनही आरोपी अवैध्यरीत्या दारू बाळगून विक्री करण्याचे सवयीचे असल्याचे निदर्शनास आल्यावरुन तसेच हे हातभट्टी विषयक गुन्हेगारी पार्श्वभूमीचे असल्याने समाज विघातक कृत्याला आळा बसावा म्हणून अधिनियम १९८१ चे एम पी डी ए कायद्या अंतर्गत दारू विक्री करण्याचे नियमात बसत असल्याने तिघांचेही विरोधात एक महिना गोंदिया जिल्ह्यातून हद्दपार करण्याचे आदेश दिले. त्यानुसार उपविभागीय अधिकारी पूजा गायकवाड यांचे आदेशान्वये तिरोडा पोलीस निरीक्षक अमित वानखडे यांचे मार्गदर्शनात उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाचे हवालदार नितेश गोस्वामी तिरोडा पो.स्टे.चे कैलास ठाकरे ,विशाल मरकाम यांनी जबाब देणार आरोपी कविता तांडेकर व दीपक चव्हाण यांना भंडारा जिल्ह्याचे सिहोरा पोलीस स्टेशन तर प्रशांत जयस्वाल यांना भंडारा जिल्ह्याचे करडी पोलीस स्टेशन हद्दीत हद्दपार केले.