
भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : जिल्ह्यातील गोसीखुर्द धरणामध्ये शंभर टक्के पाणीसाठा जमा करण्यात आला आहे असे शासनाचे म्हणणे आहे.मात्र ज्यांची जमीन यात जात नाही त्यांच्या नोंदी रेकार्डवर घेतल्या आहेत. मात्र टाकळी, खमाटा या नद्यांच्या तीरावर असलेल्या गावावर अन्याय करण्यात आला आहे या प्रकरणी योग्य सर्व्हे करण्याची मागणी करण्यात आली आहे. अन्यायग्रस्त शेतकरी संघर्ष समितीच्यावतीने देण्यात आलेल्या निवेदनानुसार शासन माहितीनुसार गोसेखुर्द धरण शंभर टक्के भरले आहे.शेतकºयांच्या शेताचे सर्व्हे ड्रोन द्वारे करण्याचे काम सुरू आहे यापूर्वी सॅटॅलाइट द्वारे सर्वे करण्यात आले होते.अधिकाºयाच्या म्हणण्यानुसार ड्रोनद्वारे व सॅटेलाईट द्वारे केलेले सर्वे हे शंभर टक्के खरे आहे.
प्रत्यक्षात ज्या शेतकºयाच्या शेतामध्ये गोसेखुर्द धरणाचे पाणी सन २०२२ मध्ये नव्हते व आजही नाही. त्या शेतकºयांच्या शेतजमिनी शासनाने संपादित करून शासन दफ्तरी नोंद करण्यात आली आहे. ही शासनाची फसवणूक आहे. प्रत्यक्षात ज्या शेतकºयांच्या शेतामध्ये पाणी शिरले आहे त्याच शेतकºयाची शेतजमीन गोसेखुर्द धरणात संपादित करण्यात यावी तसेच टाकळी, खमाटा हे गाव वैनगंगा आणि सूर नदीच्या मध्यभागी आहे.
या ठिकाणी शेती करणे अवघड आहे. त्यामुळे या गावातील संपूर्ण शेती संपादित करावी.गोसीखुर्द येथील अधिकारी, तलाठी ,मंडळ अधिकारी, ग्रामपंचायत कार्यालय येथील अधिकारी यांची संयुक्त कमेटी नेमून प्रत्यक्ष शेतकºयासमक्ष सर्व्हे करण्यात यावे . तशी सूचना ग्रामपंचायतला लावण्यात यावी. अशी मागणी अन्यायग्रस्त शेतकरी संघर्ष समितीचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर भिवगडे, कार्याध्यक्ष विष्णुदास लोणारे , नितेश बोरकर, प्रमोद भांडारकर दीपक खादाडे यांनी जिल्हाधिकारी सावनकुमार यांच्यामार्फत मुख्यमंत्री महाराष्ट्र शासन तसेच पालकमंत्री भंडारा जिल्हा यांना पाठविण्यात आले. मागण्या पूर्ण न झाल्यास आंदोलन करण्याचा ईशारा देण्यात आला .