
भंडारा पत्रिका / प्रतिनिधी तिरोडा : तालुक्यातील इंदोरा खुर्द व खडकी येथील दोन बालकांचा जीव घेऊन तिरोडा तालुक्यात दहशत पसरवणारे बिबट्यांपैकी दुसरा बिबट आज दिनांक १९ रोजी जेर बंद करण्यात वन विभागास यश आले आहे.
२९ नोव्हेंबर २०२५ व ९ जानेवारी २०२६ रोजी तिरोडा तालुक्यातील इंदोरा खुर्द व खडकी येथील दोन बालकांचा जीव घेणारे दोन बिबट्या पैकी एक बिबट १७ तारखेची रात्री जेरबंद करण्यात आला होता तर याचपैकी दुसरा मादी बिबट आज दिनांक १९ जानेवारी रोजी जेरबंद करण्यात आला असून वन विभागातर्फे मिळालेले माहितीनुसार हे नर भक्षक बीबट पकडण्याकरिता वन विभागातर्फे लावण्यात आलेले ट्रप व ड्रोन कॅमेºयातून मिळालेले लोकेशन नुसार सतरा तारखेस पकडण्यात आलेले बिबटानंतर दुसºया बिबट्याचा शोध घेणे सुरूच असताना अठरा रोजी संध्याकाळी ड्रोन कॅमेºयात एकबिबट आढळून आल्याने या बिबट्यास बेशुद्ध करण्याकरता आवश्यक इंजेक्शन तयार करण्याकरता तिरोडा पशुसंवर्धन विभागाचे डॉ.पी.यू सोनवने, डॉ. आर. के .भंदिरगे, डॉ. पियुष ठवकर यांचे चमुने बिबटास बेशुद्ध करणारे इंजेक्शन तयार करून या बिबटाचा शोध घेत असता आज दिनांक १९ चे सकाळी ६.३० दरम्यान बीबटाचा वावर बुचाटोला परिसरात दिसून आल्याने या परिसरात बांधून ठेवलेले बोकड खाण्यास बिबट आला असता वन विभागाचे कर्मचारी व बेशुद्ध करणारे पथकाने माग घेत ६.४५ चे दरम्यान या नरभक्षी बिबटास गणव्दारे बेशुद्धीचे इंजेक्शन देऊन बेशुद्ध केल्याने डॉक्टरांचे पथकाने या बिबट्यास परत शुद्धीवर आणून त्याची तपासणी केली असता हा मादी बिबट ५० किलो वजनाचा असून तीन ते चार वर्ष वयाचा असल्याचा अंदाज वर्तवून बिबट स्वस्थ असल्याचे अंदाज वर्तवल्यावरून वन विभागातर्फे या मादी बिबटास नागपूर येथील सेमिनरी हिल वन्यजीव संरक्षण केंद्रात पाठविण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.