भंडारा नगरपरिषदेची अतिक्रमणावर कारवाई

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : भंडारा नगरपरिषदेच्या वतीने शहरातील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी व सार्वजनिक रस्ते अतिक्रमणमुक्त करण्याच्या उद्देशाने बस स्थानक ते गांधी चौक या मुख्य मार्गावर आजपासून अतिक्रमण हटाव कार- वाई सुरू करण्यात आली आहे. भंडारा नगर परिषदे द्वारा राबविण्यात आलेल्या अतिक्रमण निर्मूलन मोहिमे दरम्यान ६० ते ७० कच्च्या व पक्क्या स्वरूपाचे अतिक्रमण काढण्यात आले.

१०० दिवस विशेष कृती आराखखड्याची अंमलबजावणी करताना नगरपरिषदेद्वारा ही अतिक्रमण काढण्याची कारवाई केली जात आहे. काही दिवसांपूर्वी खात रोड परिसरातील रस्त्यावर आलेले व वाहतुकीला अडथळा निर्माण करणारे अतिक्रमण करण्यात आल्यानंतर आज १९ जाने. रोजी शहरातील गांधी चौक, पोस्ट आॅफिस चौक ते बस स्थानक या मुख्य मार्गावरील अतिक्रमणावर बुलडोजर चालविण्यात आला. बाजारपेठ असून अतिक्रमणामुळे मुख्य रस्ता अरुंद झाला आहे.

अतिक्रमण करणाºयांना नगरपालिकेकडून ते काढण्याच्या सूचना देण्यात आल्यानंतरही अतिक्रमण काढले नसल्याने अखेर आज नगरपालिकेने मोहीम राबविली. नगरपालिका आणि पोलीस प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात आलेले या मोहिमेत बांबूचे तात्पुरते दुकान, टिनाचे शेड, सिमेंटचे रपटे, दुकानासमोरील लावण्यात आलेले गट्टू अशा सर्व प्रकारचे अतिक्रमण काढले गेले. ही मोहीम अशीच चालू राहणार असून अतिक्रमणधारकांनी असलेले अतिक्रमण काढून घ्यावे, असे आवाहन नगरपालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे. पालिकेचे मुख्याधिकारी जुम्मा प्यारेवाले यांच्या मार्गदर्शनात पवन कनोजे, संकेत कोचे, मिथुन मेश्राम, सनी सोनेकर, पवन मोगरे, अंकुश हुमणे, आकाश मेश्राम, सागर रगडे, अरविंद गणवीर सहभागी झाले होते.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *