
भंडारा पत्रिका / प्रतिनिधी तिरोडा : ४ मार्च रोजी तिरोडा शहरातील चंद्रभागा नाक्यावर नगर परिषद तिरोडाचे सफाई कामगाराचे मुलास तू एकच राजा उचलणारे जातीचा आहेस तुम्ही कचरा उचलण्याची कामे करा आम्ही तुम्हाला घरात घुसून मारू अशी धमकी, शिवीगाळ व मारपिट केल्याचे निषेधार्थ या आरोपींना अटक होईपर्यंत आम्ही साफसफाईचे काम करणार नाही असे म्हणत कर्मचाºयांनी आंदोलन सुरू केल्याने शहरातील कचरा उचलण्यात आला नाही.
बुधवार दिनांक ४ मार्च रोजी संत रविदास वार्ड येथील रहिवासी युवक व त्याचे मित्र चंद्रभागा नाक्याकडून आपल्या घराकडे जात असता तिरोडा शहरातील दोन युवकांनी येथील सफाई कामगाराचे मुलास तु केरकचरा उचलनारे जातीचा असून आम्ही तुझ्या जातवाल्यांना घरात घुसून मारू असे म्हणत धमकी देऊन लाथा बुक्क्यांनी त्याचे सह त्याचे दोन मित्रांना मारहाण केल्याचे निषेधार्थ तिरोडा नगर परिषदेत कार्यरत थाई व कंत्राटी कर्मचाºयांनी आज दिनांक ५ रोजी सकाळी आपले हजेरीचे वेळेस नगरपरिषदेत येऊन आमचे मुलास वजातीस शिवीगाळ करणारे युवकांना अटक होईपर्यंत आम्ही शहरातील सफाईचे किंवा केरकचरा उचलण्याचे काम करणार नाही असे म्हणत आंदोलन सुरू केले. घटनेची माहिती होताच नगराध्यक्ष अशोक असाटी व उपाध्यक्ष राजेश गुनेरिया यांनी नगरपरिषद येथे येऊन कामगारांचे म्हणणे ऐकून पोलिसात तक्रार दाखल झाल्याने पोलीस लवकरच त्या युवकांना अटक करेल आपण शहरवासीयांना अडचण होऊनये म्हणून काम सुरू करावे अशी विनंती केली मात्र कामगार आपल्या मागणीवर कायम राहिल्याने आज तिरोडा शहरात साफसफाई झाली नसून कुठलाही केरकचरा उचलण्यात न आल्याने शहरवासीयांना घाणीचा सामना करावा लागला.