योग साधकांनी सहलीतून निसर्ग, अध्यात्म व इतिहासाचा जवळून घेतला अनुभव

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : योग हा केवळ शारीरिक आरोग्यासाठीच नाही तर मानसिक शांतता आणि सांस्कृतिक वारशाशी जोडणारा एक सुंदर प्रयत्न आहे. या उद्देशाने योग भारती बहुउद्देशीय संस्था भंडारा आणि दी भंडारा महिला नागरी सहकारी पतसंस्था भंडारा यांच्या संयुक्त विद्यमाने अलीकडेच योग साधक व ज्येष्ठ नागरिकांसाठी नगरधन किल्ला, रामटेक गड मंदिर, घोगरा महादेव, कुँवारा भीमसेन आणि कोराडी देवी मंदिर आदी स्थळांची सहल आयोजित करण्यात आली. या सहलीत सर्व योग साधकांनी निसर्ग, अध्यात्म आणि इतिहासाचा आनंद घेत नवीन ऊर्जा अनुभवली.

सकाळी ८.०० वाजता राजीव गांधी चौक येथून बसद्वारे सर्व योग साधकांनी प्रस्थान केले. नगरधन किल्ल्याला भेट दिली. तेथे किल्ल्याचा प्राचीन इतिहास, वास्तुकला आणि महत्त्व यांची माहिती घेतली. त्यानंतर रामटेक गड मंदिराला भेट देऊन तेथील प्राचीन मंदिरे व कालिदास स्मारकाचा पौराणिक इतिहास जाणून घेतला. आसपासच्या पर्वतीय दºयांचे नयनरम्य दृश्य पाहून सर्वजण मंत्रमुग्ध झाले. यानंतर घोगरा महादेव येथे भेट देऊन मंदिराचे दर्शन घेतले. येथे दगडी पर्वतरांगांमधून वाहणाºया पेंच नदीचे दृश्य भेडाघाटची आठवण करून देणारे होते. त्यानंतर कुँवारा भीमसेन या स्थळाला भेट देऊन तेथील मंदिर, पेंच नदीचा विशाल परिसर आणि पर्वतीय सौंदर्य अनुभवले. काहींनी बोटिंगचाही आनंद घेतला. जंगलातून प्रवास करत निसर्गाचा आनंद घेत सायंकाळी कोराडी देवी मंदिरात पोहोचून सर्वांनी माँ जगदंबेचे दर्शन घेतले. या सहलीचा मुख्य उद्देश योगासोबत निसर्ग आणि संस्कृतीशी जवळीक साधणे हा होता.

योग हा जीवनाचा अविभाज्य भाग आहे. या सहलीचे संयोजक योग भारती बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष व प्रमुख योग शिक्षक श्री. शाम कुकडे तसेच संयोजिका दी भंडारा महिला नागरी सहकारी पतसंस्था भंडाराच्या अध्यक्षा श्रीमती दुगार्ताई डोरले मॅडम होत्या. या सहलीत सर्वश्री शाम कुकडे, अतुल वर्मा, के. झेड. शेंडे, उद्धव डोरले, वामनराव गोंधुले, प्रा. गुरुप्रसाद पाखमोड़े, आत्माराम बेदरकर, अनिल शेंडे, हरिभाऊ थोटे, मधुकर गभने, प्रभाकर तितीरमारे, मारोती शेंडे, मधुकर बोंद्रे, प्रभू मने, कृष्णा मस्के, आदी योग साधक-साधिकांचा समावेश होता.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *