
रमाकांत खोब्रागडे/भंडारा पत्रिका तिरोडा : तिरोडा शहरातील जुने नगर परिषद कार्यालयासमोरील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळ्या करता राखीव जागेवर असलेले चहापानाच्या टपºया, डिजिटल बोर्डचे अतिक्रमण काढून ही जागा मोकळी केल्याने पुतळ्यांकरता आवश्यक परवानगयांची अडचण दूर झाली आहे. तिरोडा शहरातील जुने न्यायालया मागील व जुने नगरपरिषद कार्यालयासमोरील जागा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व शिवछत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळ्याकरता राखीव असून या जागेवर मागील अनेक वषार्पासून चहापानाच्या टपºया, फुलाचे दुकान आॅनलाईन सेंटर व डिजिटल डिस्प्ले बोर्डचे अतिक्रमण करण्यात आले होते
हे अतिक्रमण काढण्याकरता अतिक्रमणधारकांना नगरपरिषद तिरोडा तर्फे अनेकदा नोटीस बजावूनही अतिक्रमण काढण्याचे सांगण्यात येऊनही अतिक्रमणधारक अतिक्रमण काढत नसल्याने ३० मार्च २६ रोजी तिरोडा नगर परिषदेचे सभेत सर्व २३ ही नगरसेवकांनी एकमताने या जागेवरील अतिक्रमण काढण्याचा ठराव मंजूर केल्यावरून अतिक्रमणधारकानां वारंवार संधी देऊनही अतिक्रमण काढण्यास तयार नसल्याने आज ६ मे रोजी नगर परिषद मुख्याधिकारी अमोल माळकर यांचे मार्गदर्शनात कडक पोलीस बंदोबस्तात क्रेन व जेसीबी चे सहाय्याने नगरपरिषद तिरोडाचे अतिक्रमण हटाव पथकाने हे सर्व अतिक्रमण काढून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळ्याकरता राखीव जागा अतिक्रमण मुक्त केल्याने पुतळ्या करता आवश्यक ना हरकत प्रमाणपत्र मिळवण्याची प्रक्रिया करणे सोयीचे होईल अशी माहिती नगरपरिषद तिरोडा मुख्याधिकारी अमोल माळकर यांनी दिली आहे.