
गर्रा बघेडा : अवकाळी पावसामुळे तुमसर तालुक्यातील गर्रा, बघेडा, रोघा, चिचोली, बापेरा, येदरबुची, सुंदरटोला, मिटेवानी, आंबागड आदी गावांतील शेतकºयांच्या रब्बी हंगामातील धान पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक शेतकºयांचे उभे पीक पावसामुळे आडवे पडले असून कापणीपूर्वीच मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने तातडीने दखल घेऊन नुकसानग्रस्त शेतकºयांच्या शेतांची मौका चौकशी करण्याचे आदेश संबंधित विभागाला द्यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे. सतत दोन दिवसापासुन होत असलेल्या अवकाळी पावसामुळे आणि गारपीट वाºयामुळे रब्बी धान्याच्या लोंबी ला लागलेले धान्य होरपळून टाकले आहे.शासनाने त्वरित पंचनामा करण्याचे आदेश दिले पाहिजे अशी मागणी शेतकºयांनी केली आहे