
काकाभाऊ भोयर /भंडारा पत्रिका खापा /तुमसर : तुमसर तालुक्यातील खापा खरबी मांढळ परिसरासह तालुक्यात मंगळवार सह पुन्हा बुधवारला ३:३० च्या सुमारास आलेल्या वादळी वाºयासह पावसामुळे शेतातील धान पीक पूर्णपणे आडवे झाले आहेत. धान कापणीला अवघे १५ ते २० दिवस बाकी असताना हाता तोंडाशी आलेला घास हिरावल्याने तालुक्यातील धान उत्पादक शेतकरी हवालदार झाला आहे.
प्राथमिक अंदाजानुसार पांजरा , मांडळ,खरबी,मिरगाव,भिकारखेडा काटेबामणी,तामसवाडी,कुसारी सह आजूबाजूच्या परिसरातील धान पीक नष्ट झाले. खत बियाणे मजुरीसाठी कर्ज काढून शेतकरी रोवणी करीत असतात. आता हातात तोंडाशी आलेला धान पीक हा जमीनदोस्त झाल्याने शेतकºयांनी जगावं की मराव हा मोठा प्रश्न शेतकºयांसमोर पडलाआहे. उभे पीकच गेले तर शेतकºयांनी करावं तरी काय? कडाक्याच्या उन्हात पाणी देऊन जोपासलेली उन्हाळी पिके आता मातीमोल झाली आहेत. एवढेच नव्हे तर लागलेला खर्चही निघणे कठीणझाल्याने शेतकरी आर्थिक कोंडीत सापडला आहे. मंगळवारसह बुधवारी आलेल्या पावसाने अर्ध्या तास चाललेल्या थरारामुळे रस्त्यावर पाण्याचा आणि गारांच्या खच साचलेला होता.
वादळ वारा इतका प्रचंड होता की उन्हाळी पिकांचे देठ अक्षरता भुईसपाट झाले . व लोंबी आलेला धान एकदम जमीन दोस्त असे अवकाळीच्या स्थितीमध्ये सरकारने मदत केली नाही तर शेतकरी यापुढे आत्महत्या शिवाय पर्याय उरला नसल्याचे बोलले जात आहे. अशी व्यथा धान उत्पादक शेतकºयांनी मांडली आहे. याबाबत सरकारने तहसीदारांना आदेश देऊन तलाठी मार्फत तात्काळ पंचनामेचे आदेश द्यावे अशी मागणी जोर धरू लागली आहे