फादर अग्नल शाळेच्या प्राचार्यांची पालकांशी अरेरावी

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी तुमसर : तुमसर तालुक्यातील मौजा तुडका येथील नामांकित ‘फादर अग्नल स्कूल’ सध्या गंभीर वादाच्या भोवºयात सापडली आहे. शाळेत शिकणाºया अनुसूचित जाती समाजातील एका ११ वर्षीय विद्यार्थ्याला जाणीवपूर्वक मानसिक त्रास दिला जात असल्याचा आणि तक्रार घेऊन गेलेल्या पालकांशी प्राचार्यांनी अत्यंत उद्धट वर्तन केल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी पीडित पालकांनी पोलीस स्टेशन आणि शिक्षणाधिकाºयांकडे धाव घेत न्यायाची मागणी केली आहे.

तुमसर येथील गोवर्धन नगरचे रहिवासी नीलम सुनीलकुमार बन्सोड यांचा मुलगा कृष्णा हा या शाळेत इयत्ता ५ वी मध्ये शिक्षण घेत आहे. पालकांच्या तक्रारीनुसार,शाळेतील शिक्षिका कृष्णाच्या शिक्षणाकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष करत असून त्याला योग्य मार्गदर्शन करत नाहीत. जेव्हा पालक ही समस्या घेऊन शाळेचे प्राचार्य प्रकाश मेज यांच्याकडे गेले, तेव्हा त्यांनी समस्येचे निराकरण करण्याऐवजी पालकांशी अरेरावी केली. “तुम्ही तुमच्या मुलाला या शाळेतून काढून दुसºया शाळेत प्रवेश घ्या,” असे बेजबाबदार वक्तव्य करून पालकांना अपमानित केल्याचा आरोप नीलम बन्सोड यांनी केला आहे.

RTE कायद्याचे उल्लंघन?

शाळा व्यवस्थापनाकडून एका लहान विद्याथ्यार्ला मानसिक दडपणाखाली आणणे आणि पालकांना सहकार्य करण्याऐवजी त्यांना शाळा सोडण्यास भाग पाडणे, हे शिक्षण हक्क कायद्याच्या (फळए) मूळ तत्त्वांच्या विरोधात असल्याचा मुद्दा आता उपस्थित केला जात आहे. या प्रकारामुळे विद्यार्थ्याच्या शैक्षणिक भवितव्यावर आणि मानसिकतेवर विपरीत परिणाम होण्याचीभीती पालकांनी व्यक्त केली आहे. पोलीसांकडे तक्रार आणि ‘स्वराज्य युवा एकता फाउंडेशन’ची आक्रमक भूमिका या फादर अग्नल शाळेच्या मुजोर कारभाराविरोधात पीडित पालकांनी पोलीस स्टेशन तुमसर येथे लेखी तक्रार दाखल केली आहे. तसेच, ‘स्वराज्य युवा एकता फाउंडेशन’ने या प्रकरणात आक्रमक भूमिका घेतली आहे. सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अमित मेश्राम यांनी जिल्हा परिषद, भंडारा येथीलशिक्षणाधिकाºयांकडे लेखी तक्रार देऊन संबंधित शिक्षक व प्राचार्यांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. “शासकीय नियमांची पायमल्ली करणाºया अशा शाळांवर कठोर प्रशासकीय कारवाई होणे गरजेचे आहे. जर दोषींवर कारवाई झाली नाही, तर तीव्र आंदोलन छेडले जाईल,” असा इशारा सामाजिक कार्यकर्ते अमित मेश्राम यांनी दिला आहे. आता या गंभीर प्रकरणी शिक्षण विभाग आणि पोलीस प्रशासन काय पावले उचलते, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *