
भंडारा पत्रिका/प्रतिनिधी लाखांदूर : लाखांदूर तालुक्यातील खैरना येथे अत्यंत दु:खद घटना घडली असून मुलाच्या मृत्यूचा धक्का सहन न झाल्याने वृद्ध मातेनेही प्राण सोडल्याची घटना उघडकीस आली आहे. या दुदैर्वी घटनेमुळे खैरना गावात शोककळा पसरली. हिरालाल विठोबा पचारे (६०) यांना २४ मे रोजी पहाटे ५ वाजताच्या सुमारास तीव्र हृदयविकाराचा झटका आला. त्यांना उपचारासाठी हलवण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. हिरालाल यांच्या मृत्यूची बातमी गावात तसेच नातेवाईकांना देण्यात आली.
हिरालाल यांची आई शारजा विठोबा पचारे (८०) या काही दिवसापूर्वी आपल्या मुलीकडे गेल्या होत्या. मुलाच्या निधनाची माहिती मिळताच त्या तातडीने खैरना गावी परतल्या, घरी पोहोचताच मुलाचा कलेवर पाहून त्यांनाही मानसिक धक्का बसला. मुलाजवळ बसून त्या ढसाढसा रडत होत्या. यामुळे अचानक त्यांची प्रकृती बिघडली आणि त्यांनी अखेरचा श्वास घेतला. माय लेकावर एकाच वेळी अंत्यसंस्कार मायलेकाच्या पार्थिवावर स्थानिक स्मशानभूमीत ग्रामस्थ नातेवाईक वमित्र परिवाराच्या उपस्थितीत एकाचवेळेस अंत्यसंस्कार करण्यात आले. सारजा विठोबा पचारे यांना हिरालाल यांच्यासह तीन मुले व दोन मुली आहेत. सर्वांची लग्न झाली असून ते स्वतंत्रपणे राहत होते. मायलेकाच्या मृत्यूची बातमी परिसरात वाºयासारखी पसरताच गावकºयांनी हळहळ व्यक्त केली. मुलावर अंत्यसंस्कार करण्याची तयारी होत असतानाच आईनेही इहलोकांचा निरोप घेतला. क्षणात काय घडते हे नातेवाईकांनाही समजले नाही. आईच्या मृत्यू ने कुटुंबावर मोठे दु:ख कोसळले.