पवनीच्या रेतीचा लाखनीत बोलबाला

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी लाखनी :- तालुक्यातील पाथरी आणि मिरेगाव या २ रेतीघाटावरून घरकुल धारकांना ५ ब्रास रेती मोफत देण्याचे धोरण शासनाने सुरु केले होते. राज्याचे महसूल मंत्री यांनी महसूल विभागास ते अंमलात आणण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार मिरेगाव १ सोनमाळा, पळसगाव आणि पाथरी या रेती घाटावरून अंदाजे एकूण २२ हजार तीनशे ब्रास रेतीसाठा उपलब्ध करून देण्याचे पत्र जिल्हाधिकारी यांनी पत्र क्र. आसन १४/खनिज/ अका/कावी /०२/ २०२६ दि. ०६/०१/२०२६ नुसार आदेश निर्गमित करून घरकुल धारकांना रेती उपलब्धकरून द्यावी.

असे आदेश काढले होते. मात्र त्या जिल्हाधिकाºयांच्या आदेशाला स्थानिक महसूल अधिकाºयांनी केराची टोपली दाखवत लाखनी, साकोली, लाखांदूर तहसीलदारांनी पळसगाव सोनमाळा असे अनेक रेतीघाट पवनीच्या रेतीसाठी सुरुच केले नसल्याची गोपनीय चर्चा आहे. त्यामुळे तेथील तस्करांचे या महसूल अधिकाºयांशी आर्थिक साटेलोटे तर नसावेत ना? अशी शंका घरकुल लाभार्थ्यात आहे. लाखनी तालुक्यात अंदाजे ३ ते ४ हजार मंजूर असून ५ ब्रास रेती मोफत देण्यासाठी आ.नाना पटोले, आ. परिणय फुके यांनी घरकुल धारकांना सहज उपलब्ध होण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा केला आणि त्यांना यशही आले मात्र स्थानिक अधिकाºयांनी त्यांच्या प्रयत्नांना निष्फळ ठरवत पवनीच्या रेतीला अधिक पसंती देत स्थानिक रेतीघाट सुरूच केले नाही त्यामुळे नाहीलाजास्तव घरकुल धारकांना अवाजवी भाव देत रेती खरेदी करावी लागत आहे.

पाथरी या नदीघाटावरील २० हजार ब्रास रेती तालुक्यातील घरकुल बांधकामाकरिता राखीव ठेवण्यात आली होती. तेथील मिरेगाव घाटावरील रेतीची वाहतूक सुरु करण्यात आली होती. पळसगाव, सोनमाळा नदीपात्रात पाणी असल्याने बंद आहेत. पाथरी घाटावरील रेती वाहतुकीसाठी सुरु करण्यात आली होती परंतु गावातील गटातटाचे राजकारण या वाहतुकीस अडथळा ठरले काहींच्या मते शाळेच्या वेळात वाहतूक करू नये, काहीच्या मते गावात धूळ निर्माण होवून नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम पडत आहे, तर काहीच्या मते रस्त्यावर पाण्याचा फवारा करून वाहतूक करावी असे मत मतांतरकरीत येथील रेती घाट बंद पाडला. हा कळीचा मुद्दा लक्षात घेवून प्रशासनाने घरकुल रेती वाहतूक बंद केली तर दुसरीकडे काही दलाल आमच्याकडे वैनगंगा (पवनी) ची रेती उपलब्ध आहे असे सोशल मिडीयावर जाहिरातबाजी करीत आहेत. त्यामुळे परिसरात पवनीची अवैध रेतीचा लाखनीत बोलबाला कसा? असा प्रश्न निर्माण झाला असून याकडे जिल्हाधिकाºयांंनी लक्ष देवून घरकुल धारकांना ५ ब्रास रेती कशी देता येईलव शासनाचे उद्धिष्ट पूर्ण करता येईल याकडे लक्ष देवून आपल्याच विभागातील धृतराष्ट्र यांचा शोध घेण्याची गरज निर्माण झाली आहे.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *