बावनथडी प्रकल्पग्रस्तांचे आंदोलन

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गर्रा-बघेड़ा : ‘मागण्या मान्य न झाल्यास उजव्या कालव्याचे पाणी बंद’ असा इशारा देत बावनथडी प्रकल्पग्रस्तांनी आज (६ मे) आंदोलन छेडले. मात्र तहसीलदार उपेश अंबादे यांनी वरिष्ठ अधिकाºयांशी दूरध्वनीवर चर्चा करून सकारात्मक आश्वासन दिल्यानंतर आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले. ११ मे ला सुसुरडोह येथे विविध मागण्यांचे निवारण करण्यासाठी कॅम्प आयोजित करण्यात आले आहे आज बावनथडी प्रकल्पाच्या उजव्या कालव्याचे पाणी बंद करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता.

परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी गोबरवाही पोलीस ठाण्याचे ठाणेदार शरद शेवाळे, आंधळगाव पोलीस ठाण्याचे ठाणेदार नितीन राठोड तसेच सिहोरा पोलीस स्टेशनचे पीएसआय सुरफाम यांनी पथकासह बंदोबस्त ठेवला होता. बावनथडी प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीने (कसमकासुर, ता. तुमसर) जिल्हाधिकाºयांना दिलेल्या निवेदनात प्रलंबित मागण्या तातडीने पूर्ण करण्याची मागणी केली आहे. ९ एप्रिल २०२६ रोजी कमकासुर येथे जिल्हाधिकाºयांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत मांडलेल्या मुद्यांवर अद्याप ठोस निर्णय न झाल्याने प्रकल्पग्रस्तांमध्ये नाराजी आहे.समितीच्या म्हणण्यानुसार, बावनथडी (राजीवसागर) प्रकल्प १९८४-८५ मध्ये केवळ १२ कोटी रुपयांत सुरू झाला; मात्र आजपर्यंत सुमारे १४०० कोटी रुपये खर्च होऊनही प्रकल्पाचा अपेक्षित लाभ मिळालेला नाही.

परिणामी, प्रकल्पग्रस्तांना घर, जमीन व रोजगाराबाबत न्याय मिळालेला नसल्याचा आरोप करण्यात आला. आंदोलनादरम्यान ‘मागण्या पूर्ण न झाल्यास कालव्यात उडी घेऊन आंदोलन तीव्र करू’ असा इशाराही देण्यात आला. दरम्यान, तहसीलदार उपेश अंबादे यांनी सांगितले की, ‘११ मे रोजी सुसुरडोह येथे पुनर्वसित नागरिकांसाठी विशेष शिबिर आयोजित करण्यात येणार असून, प्रकल्पग्रस्तांच्या शक्य त्या मागण्या तातडीने मार्गी लावण्यात येतील.’ या आंदोलनात बावनथडी संघर्ष समितीचे अध्यक्ष किशोर उईके, माजी जिल्हा परिषद सदस्य अशोक उईके, माजी नगरसेवक लक्ष्मीकांत सलामे, मनोज उईके, रोहित मरस्कोले, भिमराव नैताम, सचिन उईके, बेनी धुर्वे, बाळीक भलावी यांच्यासह मोठ्या संख्येने महिला-पुरुष प्रकल्पग्रस्त उपस्थित होते.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *