नागझिरा अभयारण्यात ‘चष्मेवाला’ पक्ष्याचे दर्शन

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी गोंदिया: विदर्भातील निसर्गसंपन्न नागझिरा अभयारण्याच्या पिटेझरी येथील डॉ. वांगारी मुटा माथाई रोपवाटिकेत अत्यंत दुर्मिळ ‘चष्मेवाला’ पक्ष्याचे दर्शन झाले. लहान आकारमान असूनही या पक्ष्याची सौंदर्यदृष्टी आकर्षक आहे; डोळ्याभोवती पांढºया रंगाचे वलय जणू काही ‘चष्मा’ घातल्यासारखे दिसते, त्यामुळे याला चष्मेवाला म्हणतात. पक्ष्याच्या डोक्यावर, पाठीवर, पंखांवर आणि शेपटीवर दवबिंदू किंवा पावसाचे मोती जमा झाल्यासारखे दिसते, तर हिरव्या पानांच्या पार्श्वभूमीवर चमकणारे हे थेंब आणि त्याचे टपोरे डोळे या छायाचित्राला वेगळीच कलात्मकता देतात. नागझिराच्या दाट जंगलात विविध पक्ष्यांचा किलबिलाट ऐकू येतो, पण अशा दुर्मिळ पक्ष्याचे दर्शन होणे हे भाग्याचा भाग मानावेसे आहे आणि अभयारण्याच्या जैवविविधतेचे प्रतीक आहे. निसर्गवेध संस्थेच्या रोपवाटिकेत पक्ष्यांच्या सुरक्षित अधिवासासाठी केलेले काम आता या छायाचित्राद्वारे संपूर्ण जगासमोर आले आहे. सोशल मीडियावर हे छायाचित्र मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, नागझिरा अभयारण्याला भेट देणाºया पर्यटकांच्या उत्सुकतेतही भर घालत आहे.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *