
भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया : येथील केटीएस जिल्हा रुग्णालयांतर्गत येणाºया बाई गंगाबाई रुग्णालयातील शासकीय नर्सिंग कॉलेजच्या ४५ विद्यार्थिनींना जेवणातून विषबाधा झाल्याची घटना आज, गुरुवारी २६ मार्च सकाळच्या सुमारास उघडकीस आली. दरम्यान, सर्व विद्यार्थीनींंना उपचारासाठी स्थानिक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात भर्ती करण्यात आले असून सर्व विद्यार्थिनींची प्रकृती धोक्याबाहेर आहे.
बाधित विद्याथीर्नींमध्ये आरती चौधरी, प्रांजली डोंगरवार, कुशिका बोपचे, स्नेहा उईके, त्रिवेणी पवार, रिमा दहागावकर, मोहिनी सोनवाने, डॉली सूर्यवंशी, सलोनी दमाहे, रिया डोंगरे, त्रिशा सेलोकर, सलोनी जनबंधू, मयुरी भेंडारकर, चंदा टेकाम, पायल फुंडे, सोनाली देवधनी, कृशाली भगत, रजनी रहांगडाले, श्वेता डोंगरे, कोमल भावे, दीपा दहीकर आदी विद्याथीर्नींचा समावेश असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे. येथील जिल्हा सामान्य रुग्णालयांतर्गत बाई गंगाबाई महिला रुग्णालयाच्या आवारात शासकीय नर्सिंग कॉलेज असून १८५ निवासी विद्यार्थीनी येथे नर्सिंगचे प्रशिक्षण घेत आहेत. सर्व विद्यार्थिनींना कॉलेजच्या कॅन्टीन मधून जेवण आणि नाश्ता दिला जातो.
दरम्यान, बुधवारी २५ मार्च रोजी रात्री विद्यार्थिनींनी जेवण करुन झोपी गेल्या. यानंतर मात्र, गुरुवारी सकाळी ७ वाजताच्या सुमारास विद्यार्थिनींना पोटात दुखणे व उलट्या होऊ लागल्या त्यामुळे एकएक करत दुपारी २ वाजतापर्यंत ४५ विद्यार्थीनींना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करून त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले. विशेष म्हणजे, नर्सिंग कॉलेजमधील सर्व १८५ विद्याथिंर्नींनी कॅन्टीनचे जेवण केले. त्यापैकी ४५ विद्याथिंर्नींना त्रास झाला. त्यामुळे नेमके या विद्यार्थिनींना विषबाधा कशातून झाली हे स्पष्ट झाले नाही. मात्र, बुधवारी रात्री जेवण केल्यानंतर हा प्रकार घडल्याने जेवणातून तर विषबाधा झाली नसावी अशी शंका व्यक्त केली जात आहे. दरम्यान या सर्व विद्यार्थिनींची परिस्थिती धोक्यावर असल्याची माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता कुसुमाकर घोरपडे यांनी भंडारा पत्रिका सोबत बोलतांनी सांगितले.