श्रीराम जन्माचा जल्लोष! श्रीराम नवमी निमित्त भंडाºयात भव्य बाईक रॅली

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : मर्यादा, सत्य, कर्तव्य आणि धर्माचे सर्वोच्च प्रतीक असलेल्या प्रभू श्रीराम यांच्या पवित्र जन्मोत्सव श्रीराम नवमी निमित्त भंडारा शहरात विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, श्रीराम उत्सव समिती तसेच सर्व हिंदू संघटनांच्या वतीने भव्य बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. शहरातील विविध भागांतून निघालेल्या या रॅलीत युवकांसह सर्वच वयोगटातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला.

भगव्या झेंड्यांनी सजलेली वाहने, जय श्रीरामच्या घोषणांनी दुमदुमलेले वातावरण आणि शिस्तबद्ध नियोजन यामुळे संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता. या प्रसंगी उपस्थितांनी प्रभू श्रीरामांनी दिलेल्या सत्य, न्याय, कर्तव्यनिष्ठा आणि धर्मपालनाच्या संदेशाचे स्मरण केले. समाजात एकता, सद्भावना आणि राष्ट्रभक्ती वृद्धिंगत करण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला. रॅलीदरम्यान सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक ती खबरदारी घेण्यात आली होती. कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल आयोजकांचे सर्वत्र कौतुक होत आहे. दोन दिवसांपासुन भंडारा गांधी चौक,खांबतलाव चौक,शास्त्री चौक यासह शहरातील अनेक चौकांचा परिसर अक्षरश: भगवा होऊ लागला होता. जिल्ह्यातही सर्वत्र राममय वातावरण होते. सायंकाळी शहरातील चारही बाजूने श्रीराम शोभायात्रा निघाली. त्यामुळे दुपारी मेरे प्रभू राम आये है; सायंकाळी राम जी की निकली सवारी! असेच वातावरण तयार झाले होते.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *