
भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया :- जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अवैध रेती वाहतुक जोमात सुरू आहे. अश्यातच एका अवैध रेती वाहतुक करणाºया टिपर (टऌ – ४० इऌ ८०८०) ने स्कूटी वरून जाणाºया एका महिलेला धडक दिली ही घटना हृदयविकारक असून आज शुक्रवारी गोंदिया तालुक्यातील दासगाव येथे दुपारच्या सुमारास घडली. यात महिलेचा घटनास्थळी च मृत्यू झाला. रामेश्वरी धनलाल नागपुरे वय ४५ राहणार कटंगी (कला) गोंदिया असे मृतक महिलेचे नाव असून ती कटंगी कला येथील रहिवाशी आहे. ती मुलगी वैष्णवी सोबत स्कूटी ने मध्य प्रदेशातील आरंभा येथे सासू च्या मैय्यत अंत्यसंस्कारासाठी जात होती असतातच रेती भरून येणाºया टिप्पर ने त्यांना धडक दिली त्यात सदरमहिलाचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर मुलगी वैष्णवी गंभीररित्या जख्मी झाली.
घटना घडताच परिसरातील नागरिकांनी आक्रोश करीत रस्ता अडवून धरला व ट्रक मालका कडून मृत महिलेच्या कुटंबीयांना ५० लक्ष रुपयाची नुकशान भरपाई मिळत नाही आणि जखमी मुलीच्या उपचाराचा संपूर्ण खर्च टिप्पर मालकाकडून लेखी आश्वसन देत नाही तो पर्यंत मृतदेहरस्त्यावरून उचलू देणार नाही. असा पवित्रा नातेवाईकाने आणि गावकºयांनी घेत रस्त्यावर टायर जाळून प्रशाशनाचा आणि तिप्पर चालकाचा निषेध केला आहे. अवैध रेती वाहतुक बंद करण्याची मागणी लावून धरली. त्यामुळे काही काळ येथील परिस्थिती तणावपूर्ण झाली होती. या घटने नंतर संतापलेल्या गावकºयांनी टिप्पर चालकाला ताब्यात घेत बेदम मारहाण करून रावणवाडी पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. पोलिस उपविभागीय अधिकारी रोहिणी बानकर, तहसीलदार श्रीकांत कांबळे तसेच इतर वरिष्ठ अधिकारी घटनास्थळावर दाखल झाले. दोन दिवसा पुर्वी सुद्धा जवळील तेढवा येथे अवैध रेती वाहतुक करणाºया ट्रॅक्टरने आशिक म्हात्रे नामक युवकाचा अपघात झाला होता हे विशेष. यात सादर प्रकरण अंगलट येऊ नये म्हणून येथील रेती माफियानी खालपासून वरपर्यंत सर्व अधिकाºयांना मॅनेज केले असल्याचे बोलले जात आहे.