
भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : रेती वाहतुक करणाºया टिप्परने मोटार सायकलला धडक दिल्याने मोटारसायकल चालक तरूणाचा जागीच मृत्यू झाला. हि घटना दि.३१ मार्च २०२६ रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास दाभाकोथुर्णा मार्गावरील दाभा येथील पोलीस चौकी परिसरात घडली.राकेश पुरूषोत्तम ढेंगे वय ३२ वर्षे रा.खमाटा (टाकळी) त.जि.भंडारा असे मृत तरूणाचे नाव आहे.
मृतक राकेश ढेंगे हा त्यांच्या मोटारसायकल क्र.एमएच ३६,सी६०९१ ने भंडारा इथुन स्वगावी खमाटा येथे जात असतांना दाभा सुरनदीपरिसरातील पोलीस चौकी जवळ कोथुर्णाकडुन भंडाराकडे भरधाव वेगाने जाणाºया टिप्पर क्र.एमएच-४०,सीटी. ४२१३ ने मृतकाच्या मोटारसायकलला समोरून जोरदार धडक दिली.या धडकेत राकेश ढेंगे यांचा जागीचमृत्यू झाला. अपघातानंतर घटनास्थळी नागरीकांनी मोठी गर्दी केली होती.
घटनेची माहिती मिळताच वरठी पोलीस स्टेशनचे ठाणेदार श्री.गिरी, मेजर बिसेन,मेजर नंदनवार, मेजर भोसले,मेजर काळे, मेजर ईलमकर,मेजर खराबे यांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. पोलीसांनी टिप्पर मालक रूपेश मारवाडे,टिप्पर चालक सुशिल मेश्राम (२८) रा.कारधा त.जि. भंडारा यांचे विरोधात अप. क्र २३६/२६ कलम १०६ (१) बीएनएस नुसार गुन्हा नोंदविला. पोलीसांनी टिप्पर चालक सुशिल मेश्राम याला ताब्यात घेवुन नंतर जामीनावर त्याची सुटका करण्यात आली.अपघातातील टिप्पर वरठी पोलीसांनी जप्त केला असुन पुढील तपास सुरू आहे.