
तिरोडा : तालुक्यातील बरबसपुरा येथील महिला शेतात कामाकरता जात असताना नागपूरकडून गोंदियाकडून जात असलेल्या गोंडवाना एक्सप्रेसचा धक्का लागून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज ५ मार्च रोजी घडली. गुरुवारी सकाळी १०.३० वाजताच्या दरम्यान बरबसपुरा येथील ३६ वर्षीय महिला संगीता अनमोल पटले शेतात कामाला जात असताना रेल्वे रूळ ओलांडत असता अचानक गोंदिया कडे जाणारे गोंडवाना एक्सप्रेसचा या महिलेस धक्का लागून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडल्याची माहिती तिरोडा पोलिसांना मिळताच महिला पोलीस उपनिरीक्षक प्रियंका बैस, हवालदार विनोद बिल्लोरे, शिपाई किशन डहारे, मोहित चौधरी, हेमंत हर्षे यांनी घटनास्थळ गाठून प्रेताचा चा पंचनामा करून प्रेत उत्तरीय तपासणी करिता उपजिल्हा रुग्णालय तिरोडा येथे पाठवून शवविच्छेदनानंतर महिलेची प्रेत नातेवाईकांचे स्वाधीन करण्यात आले.