
भंडारा पत्रिका / प्रतिनिधी तिरोडा : डॉक्टर आणि चालकाच्या तत्परतेने बाळ आणि आईचे प्राण वाचले भंडारा पत्रिका / प्रतिनिधी तिरोडा : सुधारित वेतनश्रेणी तात्काळ लागू करण्यात यावी यासह इतरही प्रलंबित मागण्यांसाठी तिरोडा येथील भूमी अभिलेख कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाºयांनी काळ्या फिती लावुन आंदोलन केले.
विदर्भ भूमी अभिलेख कर्मचारी संघटना अमरावती/ नागपूर द्वारे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना दहा डिसेंबर रोजी दिलेले निवेदनाप्रमाणे राज्यातील भूमी अभिलेख विभागातील गट क मधील कर्मचाºयांना सुधारित वेतन श्रेणी लागू करण्यात होत असलेल्या विलंबामुळे कर्मचारी वर्गात निर्माण झालेल्या असंतोषाची दखल घेऊन प्रलंबित मागण्यासह सुधारित वेतनश्रेणी तात्काळ लागू करण्याबाबत तसेच ४ जून २५ रोजी मंत्रालयात महसूल मंत्री यांचे दालनात झालेले प्रतिनिधींचे संघटनेचे बैठकीत सुधारित वेतनश्रेणी १५० दिवसात लागू करण्याचे आश्वासन मंत्री महोदयांनी दिले होते मात्र या आश्वासनाची पूर्तता न झाल्याने आज दिनांक १६ डिसेंबर व १७ डिसेंबर रोजी काळ्याफिती लावून काम करण्याच्या निर्णयाचे संघटनेचे आवाहनानुसार आज दिनांक १६ रोजी तिरोडा येथील भूमी अभिलेख कर्मचारी संघटनेचे कर्मचारी सचिव विदर्भ भूमी अभिलेख कर्मचारी संघटना गोंदिया रामकृष्ण कुंभारे, सचिव तिरोडा शाखा रोषण गराडे ,किशोर दुबे ,संतोष तिरले व इतर कर्मचाºयांनी काळ्याफिती लिहून आंदोलन केले असून उद्याही दिनांक १७ रोजी काळ्याफिती लावून आंदोलन करण्यात असल्याचे संघटनेतर्फे सांगण्यात आले