
भंडारा पत्रिका / प्रतिनिधी तिरोडा : तिरोडा बीरसी मार्गावर ट्रॅक्टर मोटार सायकलमध्ये अमोरासमोर झालेल्या धडकेत देव्हाडी येथील दोन युट्युबर युवकांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. आज दिनांक २६ डिसेंबर रोजी सकाळी नऊ तीस चे दरम्यान देव्हाडी ता.तूमसर, येथील युवक यश राजूके १८ वर्ष ,भारत बनकर १९ वर्ष हे युट्युबर युवक देव्हाडी वरून दवनीवाडाकडे दुचाकी क्रमांक एम एच ३६ ए पी ६४५४ ने जात असता तिरोडा बिरसी मार्गावरील मोठ्या नाल्याजवळ तिरोडाकडून बीरसीकडे जात असलेला ट्रकटर क्रमांक एम एच ३५ एफ ५१६७ शी आमोरासमोर जोरदार धडक झाल्याने दोन्ही युवक गंभीर जखमी झाले. दोघांनाही उपचाराकरिता नेण्याचा प्रयत्न केला मात्र रत्स्त्यातच दोघांचाही मृत्यू झाला. याप्रकरणी तिरोडा पोलिसांनी ट्रॅक्टर चालकाविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम २८१, १२५ (अ )(ब ),१०६ (१), सहकलम मोटार वाहन कायदा १८४ नुसार गुन्हा नोंद करून पुढील तपास उप पोलीस निरीक्षक नस्ते करीत आहेत.