‘नीट’ पेपरफुटीचा तपास सीबीआयकडे

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी नवी दिल्ली : वैद्यकीय प्रवेश- ासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाणारी ‘नीट’ परीक्षा अखेर पेपरफुटीच्या वादामुळे रद्द करण्याचा मोठा निर्णय राष्ट्रीय परीक्षा संस्थेने घेतला आहे. ३ मे २०२६ रोजी झालेली ही परीक्षा वादाच्या भोवयात सापडल्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये चिंतेचे वातावरण होते, मात्र आता एनटीएने फेरपरीक्षेबाबतचे धोरण स्पष्ट केले आहे. या संपूर्ण प्रकरणाची सीबीआय चौकशी केली जाणार असून, दोषींवर कडक कायदेशीर कारवाई करण्याचे संकेत देण्यात आले आहेत.

दरम्यान, ज्या विद्यार्थ्यांनी यापूर्वी नोंदणी केली होती, त्यांना फेरपरीक्षेसाठी पुन्हा एकदा अर्ज करण्याची किंवा नवीन शुल्क भरण्याची गरज भासणार नाही. विशेष म्हणजे, ३ मे रोजी विद्यार्थ्यांनी जेवढे परीक्षा शुल्क भरले होते, ते त्यांना परत केले जाईल आणि फेरपरीक्षेचा संपूर्ण खर्च एनटीए स्वत:च्या निधीतून उचलणार आहे. विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी एनटीएने परीक्षा केंद्रांच्या नियोजनात कोणताही बदल न करण्याचा निर्णय घेतला आहे.

म्हणजेच, ३ मे रोजी विद्यार्थ्यांना ज्या केंद्रावर परीक्षेसाठी बोलावले होते, त्याच केंद्रावर फेरपरीक्षा देखील घेतली जाईल. या परीक्षेचे नवीन वेळापत्रक आणि प्रवेशपत्र डाऊनलोड करण्याबाबतची माहिती लवकरच अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाणार आहे. विद्यार्थ्यांना यासंदर्भात काही शंका असल्यास त्यांनी एनटीएच्या अधिकृत हेल्पलाईन क्रमांकावर किंवा ई-मेलवर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. परीक्षा रद्द झाल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी प्रशासन वेगाने पावले उचलत असून, अधिकृत माहितीसाठी विद्यार्थ्यांनी केवळ वेबसाईटवरच विश्वास ठेवावा, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *