पवनारखारी, व गणेशपुरवासी जल प्रधिकरण मिशन पाणीपुरवठा योजनेपासून वंचित

भंडारा पत्रिका/वार्ताहर गर्रा बघेडा : तुमसर तालुक्यातील पवनारखारी, गणेशपूर हा आदिवासी बहुलगाव असून येथे जलप्राधिकरण मिशन पाणीपुरवठा करण्यासाठी शासन प्रशासनाने लाखो रुपये खर्च करून जलकुंभ बांधण्यात आले व प्रत्येक घरापर्यंत घरगुती नळ जोडणी करून दिले. ह्या शासनाचे लक्ष होते, प्रत्येक घरापर्यंत नळ द्वारे पाणीपुरवठा सुनिक्षित करणे, ग्रामीण नागरिकांचे आरोग्य व जीवनमान सुधारण करणे, स्थानिक जल स्त्रोत व्यवस्थापन बळकट करणे, जलपुरवठा योजना मध्ये समुदायाच्या सहभाग वाढविणे, जलपुरवठा पातळीवर योजना राबविण्याची जबाबदारी असते परंतु पवनारखारी गणेशपुर गावातील पाणीपुरवठा योजना ठप्प असून पाण्यासाठी गावकºयांची वनवन झाले आहे.

जिल्ह्यातील तापमानाच्या पारा चढला असून उन्हाची दहाकता वाढली. त्यामुळे गावातील घरगुती पाण्याचे स्त्रोत आटले विहिरी देखील कोरड्या पडल्या आहेत. पिण्यासाठी तसेच घरगुती वापराचे पाणी कुठून आणावे असा गावकरी पुरुष व महिलांना प्रश्न पडला आहे. ‘हर घर नल, हर घर जल’ या योजनेअंतर्गत घरगुती नळाच्या पाणी मिळण्याची महिलांना अपेक्षा होती, परंतु पवनारखारी व गणेशपुर या गावांमध्ये फक्त हर घरी नळ योजना जोडून ठेवली आहे. परंतु आजपर्यंत नळाला पाणी मिळाले नाही, स्थानिक प्रशासनाच्या उदासीन धोरणामुळे नागरिकांमध्ये रोष व्यक्त आहे. त्यामुळे गावात या योजनेच्या पूर्णता फज्जा उडाल्याचे चित्र दिसत आहे.

प्रशासनाच्या धोरणानुसार ग्रामीण भागातील प्रत्येक व्यक्तीला चाळीस लिटर पाणी दर दिवशी दर माणसी आवश्यकता आहे. मात्र पावनारखारी येथील पाण्याच्या टाकीतून एक थेंबही पाणी घरगुती नळाला येत नाही, या बाबीकडे प्रशासनाने तत्काळ लक्ष देण्याची गरज आहे असे गावकºयांनी व्यक्त केले आहे. तसेच पाच वर्षांपूर्वी सार्वजनिक बोरवेलवर गणेशपूर येथे लाखो रुपयाचे ग्रामपंचायत पौनारखारी यांनी सोलर पंप लावून पाण्याची टाकी बसविली परंतु सोलर पंप देखभाल दुरुस्तीच्या अभावामुळे ही पाण्याची टाकी आणि सोलर पॅनल भंगार झाले असून शेवटची घटका मोजत आहेत. शासन प्रशासनांनी त्वरित या गावांमध्ये लक्ष द्यावे असे सामाजिक कार्यकर्ता रूपसिंग पिलगर व पवनारखारी, गणेशपूर येथील रहिवाशांनी तसेच महिलांनी व्यक्त केली आहे.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *