
भंडारा पत्रिका / प्रतिनिधी तुमसर : आर्थिक वर्ष २०२५-२६ संपण्यास अवघे काही दिवस शिल्लक असताना, नगर परिषद तुमसरच्या कर विभागाने मालमत्ता कर थकबाकीदारांविरुद्ध कंबर कसली आहे. वारंवार सूचना देऊनही कर न भरणाºयांविरुद्ध प्रशासनाने आता थेट जप्तीची मोहीम हाती घेतली असून, बुधवार दि. २५ मार्च २०२६ रोजी बजाज नगर परिसरात धडाकेबाज कारवाई करण्यात आली. नगर परिषद प्रशासनाकडून नियमानुसार थकीत मालमत्ता धारकांना पूर्वसूचना (नोटीस) देण्यात आली होती.
मात्र, त्यानंतरही प्रतिसाद न देणाºया ८ मालमत्तांवर आज प्रत्यक्ष कारवाई करण्यात आली. या मोहिमेमुळे थकबाकीदारांमध्ये मोठी खळबळ उडाली असून, जप्तीच्या कारवाईदरम्यान घटनास्थळावरूनच थकीत कराची वसुली देखील करण्यात आली. मुख्याधिकारी मंगेश वासेकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही विशेष मोहीमराबवण्यात आली. या पथकात: कमलेश कुंभरे (सहा. कर निरीक्षक), सुहास तिरपुडे (रचना सहायक) इंगलेश्वरी कनसरे (लेखापाल) पूजा सूर्यवंशी (कार्यालयीन अधीक्षक) मोहन बोरघरे, जमील शेख, नसील अली सय्यद, महेश बुरडे या कर्मचाºयांचा समावेश होता. ही कारवाई पोलीस विभागाच्या चोखबंदोबस्तात पार पडली.