राजेगाव एमआयडीसी जवळ गोवंशाची निर्दयी वाहतूक; २७ जनावरे कोंबलेला ट्रक जप्त

२ गोण्यांचा मृत्यू

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी

लाखनी : राजेगाव एमआयडीसी जवळ राहुल डेअरी समोर २७ गोवंशीय जनावरे निर्दयतेने कोंबून कत्तलीसाठी नेत असलेला ट्रक लाखनी पोलिसांनी जप्त केला आहे। या प्रकरणी अज्ञात चालक व मालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून ट्रकसह १७.१० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे।

पोलीस अधीक्षक नूरूल हसन, अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे, रऊंड शिवम विसापूरे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक आशिष गजभिये यांनी नियुक्त केलेल्या पथकाला दि. २३ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता माहिती मिळाली। राहुल डेअरी समोर ट्रक क्र. CG-२२-C-९९७७ (किंमत १५ लाख रु) हा संशयास्पद स्थितीत उभा मिळाला।

तपासणी केली असता ट्रकमध्ये ०४ लाल गायी, ०८ लाल गोरे, ०६ पांढऱ्या गायी, ०५ पांढरे गोरे, ०२ काळे गोरे अशी एकूण २७ जनावरे भरगच्च कोंबलेली आढळली। त्यांना चारा-पाण्याची कोणतीही सोय नव्हती। यात दोन लाल रंगाच्या गोण्यांचा मृत्यू झाला होता। आरोपी चालक व मालक ट्रक सोडून पळून गेले। पोलिसांनी ट्रक व २७ गोवंश (किंमत २,१०,००० रु) असा एकूण १७,१०,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला।

याप्रकरणी लाखनी पोलीस स्टेशन येथे अप क्र. ५७२/२६ अन्वये कलम ११(१)(डी), ११ (१)(एच), ११(१)(आय) प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम, सहकलम ५(अ), ९ महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम, सहकलम ११९ महाराष्ट्र पोलीस अधिनियम व कलम ३२५ २०२३ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे। फिर्यादी पोहवा गुलाब घासले असून तपास पोउपनि देविदास बागडे करीत आहेत।

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *