
भंडारा पत्रिका / प्रतिनिधी नागपूर : केंद्राच्या ‘इज आॅफ लिव्हिंग’ निर्देशांकानुसार ग्राहक सेवा प्रदान करताना, महावितरणच्या नागपूर परिमंडलाने १ एप्रिल २०२५ ते ३१ मार्च २०२६ या कालावधीत तब्बल ६६ हजार ४२२ लघुदाब ग्राहकांना नवीन वीज जोड दिले आहेत. राज्याचे मुख्यमंत्री आणि ऊर्जामंत्री ना. देवेंद्र फडणवीस आणि महावितरणचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांच्या मार्गदर्शनात महावितरणच्या नागपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता दिलीप दोडके यांच्या नेतृत्वात नागपूर परिमंडलात ‘इज आॅफ लिव्हींग’ या संकल्पनेनुसार वीज ग्राहकांना तातडीने सेवा दिल्या जात आहेत.यात मागिल वर्षभरात नागपूर शहर मंडलातील ३८ हजार ७६६, नागपूर ग्रामीण मंडलातील १८ हजार १२६ आणि वर्धा मंडलातील ९ हजार ५३० लघुदाब ग्राहकांना नवीन वीज जोडण्या दिल्या गेल्या आहेत.
यात नागपूर जिल्ह्यात ५६ हजार ८९२ नवीन वीज जोडण्या देण्यात आल्या, यात सर्वाधिक ११ हजार ८०१ वीज जोडण्या या कॉग्रेसनगर विभागात तर त्याखालोखाल मौदा विभागात ८ हजार ५९७, बुटीबोरी विभागात ७ हजार ४८२, महाल विभागात ७ हजार २६२, सिव्हीललाईन्स विभागात ७ हजार २३, गांधीबाग विभागात ५ हजार १९८, सावनेर विभागात ३ हजर ९४२, उमरेड विभागात ३ हजार ३३९ तर काटोल विभागात २ हजार २४८ वीज जोडण्यांचा समावेश आहे. नियमित करुन सहकार्य करण्याचे आवाहन महावितरणने केले आहे. त्याचप्रमाणे वर्धा जिल्ह्यात देण्यात आलेल्या ९ हजार ५३० नवीन वीज जोडण्यांमध्ये सर्वाधिक ४ हजार ६०५ वीज जोडण्या वर्धा विभागात तर त्याखालोखाल हिंगणघाट विभागात २ हजार ६४१ तर आर्वी विभागात २हजार २४१ नवीन लघुदाब वीज जोदण्या देण्यात आल्या. या ६६ हजार ४२२ नवीन लघुदाब वीज जोडण्यांमध्ये सर्वाधिक ५३ हजार १३७ या घरगुती वीज जोडण्या असून यात नागपूर शहर मंडलातील ३१ हजार ३४१, नागपूर ग्रामीण मंडलातील १४ हजार ८४० तर वर्धा मंडलातील ६ हजात ९५८ वीज जोडण्यांचा समावेश आहे. याशिवाय परिमंडलात ९ हजार ६३५ वाणिज्यीक, १ हजार २०३ औद्योगिक आणि २ हजार ४४७ इतर वीज जोडण्या देण्यात आल्या.