कारली नाल्यालगत अवैध हातभट्टीवर धाड एक लाख दोन हजाराचा मुद्देमाल जप्त

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी तुमसर : स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गोबरवाही पोलीस ठाणे हद्दीतील कारली नाल्यालगत अवैध हातभट्टीवर छापा टाकून तब्बल एक लाख दोन हजार रूपयांचा सडवा मोहाफास जप्त केला आहे. या प्रकरणी एका आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस हवालदार पटोले यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, कारली येथील नाल्याजवळ छापा टाकण्यात आला. तेथे आरोपी राधेशाम टेकचंद नागपुरे (वय ३५, रा. कारली, ता. तुमसर) हा अवैध हातभट्टी दारूसाठी सडवा मोहाफास साठवून ठेवताना आढळून आला. झडतीदरम्यान १७ प्लास्टिक चुंगळ्यांमध्ये प्रत्येकी ३० किलो प्रमाणे एकूण ५१० किलो सडवा मोहाफास, अंदाजे १,०२,००० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी आरोपीविरुद्ध अपराध क्र. ३६/२०२६ कलम ६५ (फ) महाराष्ट्र दारूबंदी कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक नुरुल हसन, अपर पोलीस अधीक्षक नीलेश मोरे यांच्या मार्गदर्शनात पो. हवा. पटोले व स्थानिक गुन्हे शाखा पथकाने केली असून पुढील तपास गोबरवाही पोलीस करीत आहेत.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *