
भंडारा पत्रिका/प्रतिनिधी तिरोडा : २ फेब्रुवारीच्या रात्री तिरोडाचे पोलीस निरीक्षक आपल्या सहकार्यांसह गस्तीवर असताना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार अवैध पशुधनाची वाहतुक करणारे पांढºया रंगाचे वाहन चिरेखणी कडून पाटील टोलाकडे जात असल्याचे गुप्त माहितीच्या आधारे पाटील टोला येथे वाहन थांबवण्याचा प्रयत्न केला असता वाहन चालकांनी वाहन न थांबता ऐलोराकडे पळून गेल्याने पोलिसांनी पाठलाग करताच वाहन चालक वाकन सोडून व वाहनाची चावी घेऊन पळून गेल्याने पोलिसांनी वाहनाची तपासनी केली असता या वाहनात कोंबलेले १० जनावरांची सुटका करून वाहन ताब्यात घेण्यात आले.
२ फेब्रुवारी रोजी रात्री तिरोडा पोलीस निरीक्षक अमित वानखडे आपले सहकार्यांसह गस्तीवर असताना त्यांना मिळालेले गुप्त माहितीनुसार चिरेखनी कवलेवाडा मार्गाने पाटिलटोला कडे जात असल्याचे माहितीवरून पाटील टोला येथे हे वाहन थांबवण्याचा प्रयत्न केला असता वाहन चालकाने वाहन न थांबवता एलोराकडे पळून जात असता पोलिसांनी पाठलाग केला असता तिरोडा तुमसर मार्गावरील देव्हाडा येथे वाहन थांबवून वाहनाची चावी घेऊन पळून गेल्याने पोलिसांनी या बोलेरो पिकप वाहन क्रमांक एम एच ३६ एए ४१२३ ची पाहणी केली असता या वाहनात १० गोवंशीय जनावरे दाटीवाटीने कोंडून कुठलीही चारा पाण्याची व्यवस्था न करता वाहतूक करीत असल्याचे आढळल्या वरून सदर वाहन पोलीस स्टेशन तिरोडा येथे आणून जनावरे गोशाळेत पोहचवून दहा जणावरांची सुटका केली. सदर जनावरांची किंमत अंदाजे १ लक्ष व ६ लक्ष रुपयाचे पिक अप वाहन असा एकूण ७ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पो.हवा.धनंजय बारई यांचे तक्रारीवरून तिरोडा पोलिसांनी प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध करण्याबाबतचा अधिनियम, १९६० (कलम ११(१)) आणि महाराष्ट्र पशू संरक्षण अधिनियम, १९७६ च्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास उप पोलीस निरीक्षक तेजस कोंडे करीत आहेत.