
भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : भंडारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यालयात आज दिनांक ०३ फेब्रुवारी २०२६ ला महाराष्ट्र राज्याचे लाडके, प्रशासनावर जबर पकड असलेले व लोकप्रिय जननेते माजी उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या बारामतीहून आणलेल्या अस्थिकलशाचे अंतिम दर्शन घेण्याकरीता, त्यांच्या पावन स्मृतिंना उजाळा देण्याकरीता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तसेच सर्व पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी साश्रू नयनांनी श्रध्दांजली दिली. स्व. अजितदादा पवार यांचे अस्थी कलश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यालय, भंडारा येथे सकाळी ११.०० वाजता पासून दर्शनाकरीता ठेवण्यात आले. दादाचे सर्व पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरीक, शेतकरी, महिला व युवक अशा सर्व क्षेत्रातील नागरिकासोबत जिव्हाळ्याचे नाते होते. करीता संपुर्ण भंडारा जिल्हयातील सर्वपक्षीय असंख्य कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. अत्यंत शोकाकुल वातावरणात हा दर्शन सोहळा पार पडला. यावेळी गुरुदेव सेवा मंडळ गणेशपूरचे भजन सादर करण्यात आले.

स्व. अजितदादा पवार यांनी भंडारा जिल्हयातील गोसे प्रकल्प, सुरेवाडा उपसा सिंचन प्रकल्प, सोंडयाटोला उपसा सिंचन, नेरला उपसा सिंचन, करचखेडा उपसा सिंचन अशा प्रकल्पांना मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला. याप्रसंगी त्यांच्या जिल्हयातील विकासासाठी दिलेल्या योगदानावर उपस्थित मान्यवरांनी प्रकाश टाकला. त्यांच्या आठवणींना उजाळा देण्याकरीता नाना पंचबुध्दे, आमदार राजु कारेमोरे, आमदार नरेंद्र भोंडेकर, धनंजय दलाल, सुनिल फुंडे, माजी खासदार मधुकर कुकडे, माजी आमदार चरण वाघमारे, भंडारा नगर परीषद च्या नगराध्यक्ष सौ. मधुरा मदनकर, श्रीमती सरीताताई मदनकर, जीया पटेल, नरेश डहारे, आशु गोंडाणे, गोपालजी मांडवकर, अनिल गायधने, जयश्री बोरकर, देवचंद ठाकरे, शैलेश मयुर, प्रकाश मालगावे, अनिल सार्वे, कल्पना कुझेकर, अमृत बन्सोड, होमराज कापगते, धनपाल चौधरी, सुरेश धुर्वे, सौ. प्रिती जगनाडे, मधु चौधरी, महादेव मेश्राम, प्रकाश पचारे, राजु माटे यांनी स्व. अजितदादा पवार बरोबर काम करतांनी आपआपले आठवणी व मनोगत व्यक्त केले.
याप्रसंगी सर्वपक्षीय प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते, शहरातील नागरीक, तसेच मोठया प्रमाणात पत्रकार उपस्थित होते. सर्वांनी अस्थिकलशावर पुष्प अर्पण करून सामुहीक श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. दुपारी ३.०० वाजता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यालयातून भजन मंडळीनी गायन करीत अस्थिकलश विसर्जनाकरीता महाल मार्गे गांधी चौक ते पोस्ट आॅफीस चौक ते वैनगंगा घाट जुनापुलाजवळ वैनगंगा नदीमध्ये विधिवत पूजा अर्चना करुन अश्रुपुर्ण वातावरणात अस्थिकलशाचे विसर्जन करण्यात आले. त्यांच्या मृतात्यास शांती मिळण्याकरीता सर्व उपस्थितांनी प्रार्थना केली व ‘अजितदादा अमर रहे’ अशा घोषणा देण्यात आल्या.
याप्रसंगी उपस्थितांमध्ये डॉ. रविंद्र वानखेडे, एकनाथ फेंडर, परवेज पटेल, यशवंत सोनकुसरे, नागेश भगत, डॉ. श्रीकांत वैरागडे, किर्ती गणविर, रजनिश बन्सोड, राजेश डोरले, अंगराज समरीत, सुरेश बघेल, रितेश वासनिक, यादोराव भोगे, सुनिता उपरीकर, शुभांगी खोब्रागडे, हेमंत महाकाळकर, सौ. मंजुषा बुरडे, सौ. आशा डोरले, आरजु मेश्राम, महेंद्र वाहाणे, सदाशिव ढेंगे, योगराज येलमुले, राजु पटेल, योगेश सिंगनजुडे, धनु व्यास, रुबी चढ्ढा, सचिन कुंभलकर, रवि लक्षणे, लोकेश खोब्रागडे, सुनिल साखरकर, राजु शक्तीकर, दयानंद नखाते, महेबूब पठाण, लोकेश नगरे, प्रा. नारायणसिंग राजपूत, राहुल निर्वाण, मनिष वासनिक, सुकराम अतकरी, निशा राऊत, करुणा तलमले, वंदना तुरस्कर, सरिता तुरस्कर, अजय मेश्राम, धनवंता बोरकर, प्रकाश पचारे, क्रिष्णा उपरीकर, मौसम ठाकुर, विक्रांत वैरागडे, राजू देसाई, नरेंद्र ठाकरे, चंद्रशेखर भिवगडे, व फार मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.