अल्पवयीन मुलीचा विनयभंग

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी तुमसर : शहरातील लोटन पोहा चौक परिसरात एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पीडितेच्या तक्रारीवरून तुमसर पोलिसांनी एका १७ वर्षीय विधीसंघर्ष बालकाविरुद्ध भारतीय न्याय संहिता आणि ‘पॉक्सो’ कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मुलगी १६ वर्षांची असून ती इयत्ता ११ वी मध्ये शिक्षण घेत आहे. जुलै २०२५ पासून तर फेब्रुवारी २०२६ च्या पहिल्या आठवड्यापर्यंत संबंधित विधीसंघर्ष बालकाने तिला वेळोवेळी त्रास दिला. ही घटना तुमसर येथील लोटन पोहा चौक परिसरात घडली आहे.

सततच्या त्रासाला कंटाळून पीडितेने कुटुंबियांच्या मदतीने पोलीस ठाण्यात धाव घेतली. या तक्रारीवरून पोलिसांनी भारतीय न्याय संहिता च्या कलम ६४(२)(्र), ११५(१), ३५१(२) आणि (इठर) बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियम (पॉक्सो) २०१२ च्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. कायद्याच्या तरतुदीनुसार, अशा प्रकरणांमध्ये पीडित मुलगी आणि विधीसंघर्ष बालक या दोघांचीही नावे किंवा ओळख जाहीर करता येत नसल्याने पोलिसांनी त्यांची नावे गोपनीय ठेवली आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी लोटन पोहा चौक येथील घटनास्थळाची पाहणी केली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस प्रशासनाकडून केला जात असून, विधीसंघर्ष बालकावर बाल न्याय कायद्यानुसार पुढील कार्यवाही करण्यात येत आहे.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *