धानाचे चुकारे रखडल्याने शेतकरी आक्रमक

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी लाखांदूर : गेल्या तीन महिन्यांपासून खरीप हंगामातील धानाचे चुकारे न मिळाल्याने मेटाकुटीला आलेल्या शेतकºयांनी आज मंगळवार, ३ फेब्रुवारी रोजी लाखांदूर तहसील कार्यालयासमोर ‘फटाके फोडो’ आंदोलन केले. तर भारतीय किसान संघाच्या पाठींब्याने हे आंदोलन करण्यात आले असून, झोपलेल्या प्रशासनाला जागे करण्यासाठी फटाक्यांच्या आवाजात सरकारचा निषेध नोंदवण्यात आला.

खरीप हंगाम २०२५-२६ मधील धान विक्री करून तीन महिने उलटले तरी अद्याप शेतकºयांच्या खात्यात हक्काचे पैसे जमा झालेले नाहीत. यामुळे पुढील हंगामाची तयारी कशी करावी, असा यक्षप्रश्न शेतकºयांसमोर उभा ठाकला आहे. यासोबतच धान खरेदीचे उद्दिष्ट संपल्याने अनेक शेतकºयांचे धान अजूनही घरातच पडून आहे. याकडे लक्ष वेधण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावे असलेले निवेदन तहसीलदार वैभव पवार यांना सादर करण्यात आले.

धान विक्रीचे रखडलेले सर्व चुकारे तात्काळ शेतकºयांच्या खात्यात जमा करावेत. धान उत्पादकांना क्विंटलऐवजी दरवर्षीप्रमाणे हेक्टरी ३०,००० रुपये बोनस जाहीर करावा. धान खरेदीचे उद्दिष्ट वाढवून देऊन रेंगाळलेली खरेदी पूर्ण करावी. अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे होऊनही अद्याप भरपाई मिळाली नाही, ती त्वरित द्यावी. ज्या शेतकºयांनी वीज जोडणीसाठी पैसे भरले आहेत, त्यांना तात्काळ कनेक्शन द्यावे.

या आंदोलनामुळे तहसील परिसर घोषणांनी दणाणून गेला होता. तर जिल्हा मार्केटिंग अधिकारी कार्यालयातून लेखी आश्वासन देऊन दोन दिवसात चुकारे शेतकºयांना देण्यात येणार असल्याचे सांगितले. तर दोन दिवसात चुकारे व खरेदी मर्यादा वाढवून न दिल्यास तीव्र आंदोलन जिल्हा कार्यालयात केले जाईल. असा निवेदन यावेळी नायब तहसीलदार सुनील पवार यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले. या वेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती डॉ. सुरेश ब्राम्हणकर, माजी समाज कल्याण सभापती चंद्रशेखर टेंभुर्णे, पंचायत समिती सदस्य मंगेश राऊत, जितेंद्र पारधी, भारतीय किसान संघाचे जिल्हा मंत्री दिनेश कापगते, विजयलक्ष्मी सहकारी भात गिरणी चे अध्यक्ष स्वप्नील हटवार, धनराज हटवार, लोचन पारधी, गोविंदा बरडे, रुपेश वझाडे, दिलीप ब्राम्हणकर, योगेंद्र ब्राम्हणकर, राजू घोरमोडे, विकास हटवार, गजानन शहारे, सुभाष खिलवानी, विलास उकरे, निकेस दिवटे, विजय जाधव, रामभक्त मिसार, संजय कावळे, ऋग्वेद येवले, शामराव देशकर, आणि परिसरातील शेकडो शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *